काय सांगता! आता मुंबईतील या 30 हजार लोकांना मिळणार म्हाडाची घरे, पहा तुम्हाला घर मिळणार का?

मुंबई : आता पुन्हा मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी आहे, आता मुंबईतील 30 हजार लोकांना म्हाडाची घरे (Mhada Flats Mumbai) मिळणार आहेत. मुंबईतील असंख्य लोकांचे मुख्य स्वप्न मुंबईत हक्काचे घर (2 bhk flat Mumbai) खरेदी करणे हे असते. त्यासाठी दिवसरात्र मेहनत करून सामान्य मुंबईकर घर खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यात काही लोकांचे स्वप्न पूर्ण होते तर काहींचे स्वप्न पूर्ण होत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे घर खरेदी करण्यासाठी लागणारे मोठे बजेट.. आवश्यक बजेट नसल्याने सामान्य मुंबईकरांना घर खरेदीचा निर्णय पुढे ढकलावा लागतो. पण आता म्हाडाकडून सर्व सामन्यांच्या बजेटमध्ये घरं मिळत असल्याने नागरिकांचे घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. आता मुंबईतील 30 हजार नागरिकांना म्हाडाची घरे दिली जाणार आहेत. म्हाडाची ही घरे नेमकी कोणाला मिळणार? याची माहिती जाणून घेऊया..

मुंबईतील या लोकांना लागली घरांची लॉटरी, यात तुमचे नाव आहे का? येथे क्लिक करून पहा..

दक्षिण मुंबईत (South Mumbai) राहत असणार्‍या बर्‍याच रहिवाशांचे पुनर्विकासादरम्यान आलेल्या वेगवेगळ्या अडचणींमुळे पुनर्वसन करता आलेले नाही, अशा नागरिकांचा म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील आकडा जवळपास 30 हजार एवढा आहे. आता म्हाडाच्या नवीन धोरणामुळे यामधील पात्र असलेल्या अर्जदाराला घर (Flat) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हाडाद्वारे मिळणाऱ्या अतिरिक्त चौरस फुटांचे घर घेण्याची क्षमता एखाद्या अर्जदाराची नसेल तर त्याचा देखील घराचा दावा कायम राहणार आहे आणि तो राहत असलेल्या घराएवढेच घर त्या संबंधित अर्जदाराला मिळणार आहे. दक्षिण मुंबईतील (South Mumbai) सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा तिढा बर्‍याच वर्षांपासून कायम आहे.

नवी मुंबईत सिडको काढणार 5000 स्वस्त घरांची लॉटरी, येथे क्लिक करून पहा सिडकोची ही घरे कुठे असणार?

तसेच काही इमारतींच्या पुनर्विकासाच्या काळात बर्‍याच रहिवाशांना घरे मिळण्यास अडचणीत येतात. यामध्ये अनेक अडचणी असतात, जसे की जागेची अडचण आणि पुनर्विकासाची अडचण तसेच अशा बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागत असतो. दरम्यानच्या काळामध्ये अशा रहिवाशांना संक्रमण शिबिरामध्ये घरे देण्यात येतात. आणि नंतर याच रहिवाशांची मास्टर लिस्ट तयार करण्यात येते आणि रहिवाशांना म्हाडाद्वारे घरे दिली जातात. (Mhada Flats South Mumbai)..

Leave a Comment