‘या’ शेतकर्‍यांना मिळणार मोफत बियाणे; सोयाबीनच्या JS 2034 व JS 2098 या वाणांचा समावेश..!

बीज उत्पादक कंपन्यांनी या वर्षी जवळ जवळ सर्वच बियाण्यांची विक्री किंमत वाढविली आहे. या दर वाढीचा फटका शेतकऱ्याच्या खिशाला चांगलाच बसणार आहे. त्यात अर्धा जून महिना उलटत आला आहे, पण कोकण वगळता अजूनही मान्सून उरलेल्या महाराष्ट्रात पोचला नाही.

सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे, की सोलापूर जिल्हा प्रशासनाने जिल्यातील कोविड काळात कोरोना संसर्गाने मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबाच्या वारसदारांना कृषी विभागाकडे उपलब्ध झालेले सोयाबीन व तुरीचे बियाणे सर्व प्रथम देण्यात येणार आहे. (These farmers will get free seeds, Includes JS 2034 and JS 2098 varieties of soybean)…

येथे वाचा  – सोयाबीनची बीज प्रक्रिया अशा पद्धतीने करून भरघोस उत्पादन मिळवा..!

या संबंधित निर्णय सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक यांनी घेतल्याचे बोलले जात आहे. तसेच या निर्णयाचे आदेश पण देण्यात आलेले आहेत आणि परिपत्रक पण काढण्यात आलेले असल्याचे बोलले जात आहे. या निर्णयाचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

मिळालेल्या माहिती प्रमाणे सोयाबीन आणि तुरीचे हे बियाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. जे व्यक्ती कोरोना मुळे मृत पावले आहे, त्यांच्या वारसदारांना हे मोफत बियाणे मिळणार आहे. या वारसदारांना हे बियाणे प्राधान्याने दिले जाणार आहे.

येथे वाचा  – सोयाबीनचे हे वाण बनवतील मालामाल; पहा सोयाबीनचे 5 जबरदस्त वाण..!

या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल सोयाबीन पेरणी कडे जास्तच दिसत आहे. कदाचित या कारणामुळे हा निर्णय घेतला गेला असावा. ज्या घरातील पती व पत्नी हे कोरोना संसर्गाने मृत पावले आहे अशा कुटुंबातील वारसदारांना या आदेशाचा फायदा होणार आहे. सदरील आदेश हा जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री बाळासाहेब शिंदे यांनी दिलेला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 3200 सोयाबीन चे बॅग वाटण्यात येणार आहे. सोयाबीन च्या एक बॅगचे वजन 8 किलो असणार आहे. या मध्ये सोयाबीनचे J S 2034 व J S 2098 या वाणांचा समावेश आहे. तसेच तुरीचे 2320 बॅग वाटप करण्यात येणार आहे. तुरीच्या एका बॅगचे वजन 4 किलो आहे….

ताजे बाजार भाव, हवामान अंदाज आणि शेती विषयक दर्जेदार माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा..