शेतकर्‍यांनो ! कमी वेळात पैसाच पैसा; शेळी पालनासाठी करा फक्त ‘या’ पाच जातींची निवड..!

Read Marathi Online : शेती मध्ये पशु पालन या शेतीपूरक व्यवसायाला एक अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे. त्या पैकी मांस उत्पादन देणारा पशु पालन व्यवसाय सध्या गती पकडत आहे. कारण दिवसेनदिवस मांस खाणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे.

मांस उत्पादन व्यवसायात कुकुट पालन, वराह पालन, शेळी पालन इ. प्राणी मोडतात. त्यातल्या त्यात बोकडाचे मांस सर्वात जास्त लोकप्रिय आहे. खाण्यास चवदार आणि सकस असल्याने मास खाणार्‍यांची पसंती बोकड मांसाला जास्त असते. त्या मुळे भविष्यातही शेळी पालन व्यवसाय नक्कीच फायद्याचा ठरणार आहे.

तरी शेळी पालन व्यवसाय करायचा म्हटला की प्रश्न पडतो तो शेळीच्या जातीचा. तसे पाहायला गेले तर भारतात शेळ्यांच्या अंदाजे 50 प्रकारच्या जाती आहे. त्यातील काही मोजक्या जातींना व्यवसायिक महत्व आहेत की ज्या व्यावसायिक दृष्टीने खूपच फायद्याच्या आहेत आणि कमी वेळेत अधिक उत्पन्न देणार्‍या आहेत. नेमक्या कोणत्या जाती शेळी पालनात महत्वाच्या आहे ते आपण आता पाहणार आहोत.

येथे वाचा  – सोयाबीनचे हे वाण बनवतील मालामाल; पहा सोयाबीनचे 5 जबरदस्त वाण..!

या आहेत शेळीच्या टॉप 5 जाती

(1) उस्मानाबादी शेळी (Osmanabadi goat)

उस्मानाबादी शेळी ही महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध जात आहे. ही शेळी महाराष्ट्रात जवळ जवळ सर्वच ठिकाणी पाळली जाते. या शेळीचा वापर प्रमुख मांस उत्पादनासाठी केला जातो. हिच्या मांसामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने, मांसाला बाजारात जास्त मागणी असते. दुधाचे प्रमाण कमी असते.

उस्मानाबादी शेळीच्या चांगल्या प्रतीच्या बोकडाची किंमत 11 ते 15 हजारापर्यंत आहे. या शेळीच्या मांसाला जास्त दर मिळतो.

येथे वाचा  – कापसाचे हे टॉप १० बियाणे (वाण) तुम्हाला बनवतील लखपती..!

(2) सिरोही शेळी (Sirohi Goat)

या जातीचे पालन मुख्य करून मांसासाठीच केले जाते. योग्य ते चारा नियोजन केल्यास, ही शेळी कमी वेळेत जास्त वजन प्राप्त करते. या शेळीचे पालन सर्वाधिक शेतकरी करतात. या शेळीच्या मांसाला बाजारात भरपूर मागणी असते. हिची दूध देण्याची क्षमता खूप चांगली आहे. बाजारात एका सिरोही बोकडाला 12 ते 14 हजार किंमत आहे.

(3) बिटल शेळी (Beetal Goat)

या शेळीचे पालन दुहेरी उद्देशाने  केले जाते. ही जात दूध आणि मांस दोन्ही साठी चांगली आहे. या शेळीत 2.5 ते 3.2 लिटर दुध देण्याची क्षमता आहे. या शेळीच्या बोकडाला बाजारात 10 ते 14 हजार दर मिळतो.

(4) बारबरी (Barabri)

या शेळीचे पालन कुठलेही विशेष लक्ष न देता केले जाऊ शकते. या शेळीला आपण कुठेही अगदी सहज रित्या पाळू शकता. मोकळ्या चराई साठी ही शेळी चांगली आहे. ही शेळी मांस आणि दूध दोन्ही उत्पादनासाठी उपयोगी आहे. भारतीय बाजारात हीचा सर्वसाधारण दर 10 ते 14 हजार आहे.

(5)  जमुनापरी (Jamunapari)

ही जात शेळीच्या सुधारित जातींपैकी एक जात आहे. कमी चाऱ्यातही चांगली वाढ होत असल्यामुळे आणि भरपूर दूध देत असल्यामुळे, शेळी पालन व्यवसायासाठी ही एक अतिशय चांगली जात आहे. या शेळीचे दुधाचे प्रमाण 2 ते 3 लिटर आहे. हिच्या दुधात आणि मांसात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. कदाचित या मुळे या शेळीला बाजारात जास्त मागणी असते. हिची किंमत 10 ते 16 हजार दरम्यान असते.

तर शेतकरी मित्रांनो वरील पैकी एका किंवा अनेक शेळींचे संगोपन करून आपण निश्चितच चांगला नफा मिळवू शकता.

शेतमालाचे बाजार भाव आणि शेती विषयक महत्त्वाच्या माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा..