मुंबईकरांनो! आता मुंबईत 35 लाखांचे घर अवघ्या 27 लाखांत उपलब्ध होणार; सिडकोचा मोठा निर्णय, या लोकांना मिळणार लाभ..!

Cidco Flats Navi Mumbai : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मुंबईतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सिडकोकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता मुंबईतील नागरिकांना कमी किमतीत घर मिळणार आहे. नवी मुंबईत 35 लाखांचे घर अवघ्या 27 लाखांत मिळणार असल्याने नवी मुंबईत स्वस्तात घर (Cidco Flats Navi Mumbai) घेण्याचे नागरिकांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. घरांच्या किमती 6 लाख रुपयांनी कमी करण्याचा महत्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून सिडकोने घेतला आहे. नवी मुंबईतील सिडकोची ही घरे (Cidco Flats Kharkopar) आता काही नागरिकांना मिळणार आहे. या स्वस्त घरांसाठी कोण पात्र असणार? याची माहिती जाणून घेऊया.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

सिडकोच्या माध्यमातून उलवे येथील बामणडोंगी आणि खारकोपर (Kharkopar) रेल्वेस्थानक परिसरामध्ये जाहीर करण्यात आलेल्या महागृहनिर्माण योजनेमधील घरांच्या किमती 6 लाखांनी कमी करण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे. या अगोदर या घरांच्या किंमती 35 लाख 30 हजार रुपये अशा होत्या. पण आता या निर्णयानंतर ही घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळत असलेल्या अनुदानासह अवघ्या 27 लाखात उपलब्ध होणार आहे.

मुंबईत स्वस्तात घर घ्यायचे असेल तर ही ट्रिक लक्षात ठेवा; मिळेल खूपच स्वस्तात घर, येथे क्लिक करून पहा बातमी..

या नागरिकांना मिळणार 27 लाखात घर (Cidco Flats Navi Mumbai)

सिडकोकडून खारकोपर (Kharkopar) आणि बामणडोंगरी रेल्वेस्थानक परिसरामधील 7 हजार 849 एवढ्या घरांची सोडत काढण्यात आली होती. यातील बामणडोंगरी प्रकल्पामधील 4 हजार 869 एवढी घरे पंतप्रधान आवास योजनेची म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी आहेत. या योजनेची संगणकीय सोडत 17 फेब्रुवारी 2023 मध्ये काढण्यात आली होती. या घरांची किंमत 35 लाख असल्याने अर्जदारांना एवढी रक्कम जमवणे शक्य नव्हते. हे सर्व लक्षात घेऊन सिडकोकडून घरांच्या किमती 6 लाखांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ही घरे 27 लाखांना उपलब्ध होणार असून 4 हजार 869 एवढ्या अर्जदारांना याचा लाभ मिळणार आहे.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

Leave a Comment