म्हाडाचे ही घरे ठरणार फायदेशीर, तुम्ही घरासाठी अर्ज केला का?

Mhada Flats Mumbai : म्हाडाचा कोकण विभाग अलीकडे चिंतेत असल्याचा दिसत आहे. कारण की त्या विभागामधील बोळींज, विरार येथील गृह प्रकल्पामधील उर्वरित म्हाडाच्या घरांची (Mhada Flats) विक्री होत नाही. परंतु वसई, विरार या विभागांमध्ये मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी बोळींज प्रकल्पामधील पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी चिन्हे दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये तेथील घरांच्या विक्री बाबत मंडळाच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी असलेली 2278 घरांपैकी शेवटच्या घराची जोपर्यंत विक्री होत नाही तोपर्यंत अर्ज विक्री स्वीकृती सुरू असेल (MHADA lottery registration). बोळींज परिसरामध्ये जवळपास 10,000 गृहनिर्माण प्रकल्पामधील 2000 पेक्षाही अधिक घरे कित्येकदा सोडत काढून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेत समाविष्ट करूनही विक्री झाली नाही. त्यामुळेच कोकण मंडळ चिंताग्रस्त झाले आहे.

काय सांगता! म्हाडा विकणार कमी किमतीत 12 हजार घरं, येथे क्लिक करून पहा बातमी..

म्हाडा कोकण मंडळाच्या माध्यमातून 13 डिसेंबर रोजी पुन्हा सोडत काढली जाईल. त्यामध्ये 2278 न विकलेल्या घरांचा समावेश केला आहे. या घरांसाठी अर्ज प्रक्रियेची मुदत शुक्रवारी रात्री 11.59 वाजता संपली आणि या कालावधीमध्ये 2278 घरांसाठी फक्त 454 अर्ज जमा रकमेसह जमा झाले. त्यामुळे आता एकूण घरांपैकी 454 घरांची विक्री होईल याची हमी मिळाली आहे.

खुशखबर! मोक्याच्या ठिकाणी म्हाडाचे घर मिळणार; येथे क्लिक करून पहा कोठे आणि कधी मिळणार?

बोलिंजमधील घरांसाठी मंडळाने अर्ज व विक्री करण्यासाठी 2 डिसेंबर पर्यंत, तसेच RTGS, NEFT च्या माध्यमातून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 4 डिसेंबर पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे या घरांची अर्ज विक्री स्वीकृती सुरू असेल. कोकण विभागाचे मुख्याधिकारी मारोती मोरे यांनी अशी माहिती दिली की, 4 डिसेंबर नंतरही अर्ज विक्री स्वीकृती सुरू असेल. असा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता बोळींज प्रकल्पांमधील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. ही बाब नक्कीच दिलासादायक आहे, असे मोरे म्हणाले.

आता पुण्यात याठिकाणी मिळतायेत सर्वात स्वस्त घरे; येथे क्लिक करून पहा कुठे मिळेल स्वस्त घर..

454 अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र: (Mhada Applicant)

बोळींज येथील 2278 म्हाडाच्या घरांसाठी (Mhada Homes) बरोबर 454 इच्छुक नागरिकांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत. अशावेळी उर्वरित घरांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असेल. 454 अर्जदारांना सोडती मध्ये समाविष्ट केले जाणार नाही. त्यांना थेट विजेते म्हणून घोषित केले जाईल. इमारत तसेच घरांचे क्रमांक निश्चित केल्यानंतरच सर्व विजेत्यांना तात्पुरती देकार पत्र वितरित केली जातील. नंतर पुढील काही दिवसांमध्ये घरांचा ताबा दिला जाईल. असा निर्णय घेण्यात आला.

Leave a Comment