आता या मुंबईकरांना सरकारकडून मिळणार 1 BHK घर; या सुविधाही मिळणार, पहा बातमी..!

1 BHK Home Mumbai : मुंबईकरांना आपल्या हक्काचे मुंबईत घर मिळावे यासाठी सरकारकडून विविध गृह योजना (Housing Scheme) आणि प्रोजेक्ट आणले जातात. मुंबईत दिवसेंदिवस निर्माण होत असलेल्या पायाभूत सुविधांमुळे घरांचे दर गगनाला भिडले आहेत. अलीकडेच सुरू झालेल्या अटल सेतू पूल मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटसाठी (Real Estate Mumbai) मोठा गेम चेंजर ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याच पुलामुळे मागील 6 महिन्यात उल्वेमधील प्रॉपर्टीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. द्रोणागिरी तसेच चिर्लेमध्ये देखील प्रॉपर्टीच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे आता सामान्य माणसाला दिवसेंदिवस मुंबईत घर घेणे खूपच अवघड होत आहे. परिणामी मुंबईकरांना छोट्या-छोट्या अपार्टमेंटमध्ये दाटीवाटीने राहावे लागत आहे. काहींकडे तर अजूनही हक्काचे घर नाही. त्यामुळे आता सरकारकडून मिळत असलेल्या म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी (Mhada Flats Mumbai) अर्ज करण्यासाठी लोक पुढे येऊ लागले आहेत.

आता म्हाडाच्या 1 BHK घरांसाठी अर्ज करा; ही आहे शेवटची तारीख, येथे क्लिक करून पहा लोकेशनसह घराची किंमत..!

अलिकडेच मुंबईकरांसाठी पुन्हा एक मोठी बातमी आली आहे. आता मुंबईतील काही नागरिकांना 1 बीएचके घर (1 BHK Home Mumbai) मिळणार आहेत. हे घर 350 चौरस फुटाचे असून यात स्वतंत्र स्वयंपाकघर आणि शौचालय असणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे हे घर धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये पात्र असलेल्या रहिवाशाला देण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूह यांचे संयुक्त उपक्रम असलेल्या डीआरपीपीएलने केली आहे.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

या सुविधाही मिळणार

धारावीचा कायापालट करण्याचे महत्वाचे काम सरकारने हाती घेतले आहे आणि या कामासाठी डीआरपीपीएल कंपनीची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे धारावीकरांना जास्तीत जास्त चांगल्या सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पात मनोरंजन क्षेत्र, मुलांसाठी संगोपन केंद्रे, सामाजिक सभागृहे, सार्वजनिक उद्याने आणि दवाखाने अशा सोयी असणार, असे डीआरपीपीएलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

घराची किंमत कितीही असो, घर तर घेणारच… मुंबई शहरात घर खरेदी जोरात, मुंबईत इथे मिळणार बजेटमध्ये घर..!

Leave a Comment