आनंदाची बातमी : आता मुंबईतील या लोकांना लागली म्हाडाच्या घरांची लॉटरी, यादीत तुमचे नाव आहे का?

मुंबईत स्वतःचे घर (2 BHK Flat Mumbai) असावे असं प्रत्येकाला वाटत असतं. पण मुंबईत घर खरेदी करण्यासाठी जवळ मोठा पैसा असणं आवश्यक आहे. त्याचे कारण म्हणजे मुंबईत घरांना मोठी मागणी असल्याने दिवसेंदिवस घरांच्या किंमती भरमसाठ वाढत आहे. मुंबईत छोट्या आकाराचे घर देखील महाग मिळते. घर चांगल्या लोकेशनवर असेल तर ते सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असते. त्यामुळे सामान्य कुटुंबांना मुंबईत घर खरेदी करता येत नाही. म्हणून अशा सामान्य कुटुंबांना मुंबईत हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारने म्हाडा, सिडको आणि प्रधानमंत्री आवास यासारख्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमुळे मुंबईत परवडणाऱ्या दरात घर (Affordable Flats Mumbai) मिळणे शक्य झाले आहे.

मुंबईत म्हाडा लॉटरी योजना (Mhada Lottery Scheme) खूपच लोकप्रिय आहे. अनेक लोक मुंबईत घर घेण्यासाठी म्हाडाच्या लॉटरीची प्रतीक्षा करतात. आतापर्यंत अनेक मुंबईकरांच्या घराचे स्वप्न म्हाडाने पूर्ण केले आहे. आतापर्यंत अनेकांना म्हाडा लॉटरीच्या माध्यमातून मुंबईत हक्काचे घर (Mhada Flats Mumbai) मिळाले आहे. अलीकडे देखील मुंबईतील काही लोकांना म्हाडाच्या घरांची लॉटरी लागली आहे. त्यामुळे आता त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

पहा कोणाला लागली घराची लॉटरी?

नुकतेच ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळातर्फे घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2020 या वर्षी बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांकरिता जाहीर करण्यात आलेल्या सोडतीमधील यशस्वी ठरलेल्या पात्र 304 एवढ्या गिरणी कामगार-वारस यांना नवव्या आणि दहाव्या टप्प्याअंतर्गत घरांच्या चाव्या वाटप करण्यात आल्या आहेत.

बंद व आजारी अशा 58 गिरण्यांमधील या आधी पार पडलेल्या सोडतीत यशस्वी न होऊ शकलेल्या एकूण 1,50,484 एवढ्या गिरणी कामगार तसेच त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती करण्यासाठी कालबद्ध विशेष अभियान सध्या सुरू आहे. या अभियानाला गिरणी कामगार तसेच वारसांचा प्रतिसाद वाढत असल्याने या अभियानाला 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

मुंबईकरांनो! आता मुंबईत 35 लाखांचे घर अवघ्या 27 लाखांत उपलब्ध होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment