खुशखबर! नवीन वर्षाच्या तोंडावर मुंबईतील या लोकांना लागली घरांची लॉटरी, पहा यात नाव कोणाचे?

Mhada Lottery Mumbai : हक्काचे घर असावे अशी इच्छा मनात ठेवणार्‍यांसाठी म्हाडा म्हणजे एक मदतीचा हात समजला जातो. अलीकडच्या महागाईच्या काळात म्हाडा किफायतशीर दरामध्ये मोक्याचा ठिकाणी घरं उपलब्ध करून सर्वसामान्यांचं स्वप्न केलं जातं. यासाठी म्हाडाकडून वेळोवेळी घरांच्या लॉटरी (Mhada Lottery Mumbai) जाहीर करण्यात येतात. मुंबईतील साधारण वन बीएचके घरांच्या किंमतीही (1 bhk flat Mumbai) झपाट्याने वाढत असल्याने अनेक लोकांना भाड्याच्या घरात दिवस काढावे लागतात. अशा परिस्थितीत म्हाडाकडून घर मिळायला पाहिजे, असं स्वप्न अनेकांचं असतं. आजपर्यंत अनेकांना म्हाडाची परवडणारी घरे (Affordable Mhada Flats) मिळाली आहे.

अलीकडेच मुंबईतील अनेक लोकांचे म्हाडाच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून लॉटरीतील यशस्वी ठरलेल्या पात्र 160 एवढ्या गिरणी कामगार तसेच वारसांना घरांच्या चाव्या देण्यात आलेल्या असताना आता पुन्हा एकदा मुंबईतील काही लोकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

मुंबईकरांनो! संधी सोडू नका; ज्यांच्याकडे हक्काचं घर नाही अशा लोकांसाठी अल्पदरात घरं, येथे क्लिक करून पहा बातमी..

या लोकांचे हक्काच्या घराचे स्वप्न अखेर पूर्ण

अनेक वर्षांपासून म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरामध्ये राहत असलेल्या 265 एवढ्या भाडेकरुंच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. बृहतसूचीवरील 265 एवढ्या पात्र विजेत्यांकरिता गुरूवार रोजी पहिली संगणकीय सोडत काढण्यात आली असून या सोडतीच्या माध्यमातून 225 चौ. फूट (प्रत्येकी दोन) ते 753 चौ. फुटाची घरे वितरीत केली जाणार आहेत. आता लवकरात लवकर या घरांचा ताबा दिला जाणार असल्याने कित्येक वर्षांपासून संक्रमण शिबिरामध्ये राहणार्‍या या भाडेकरुंना आता हक्काच्या घरामध्ये रहायला जाता येणार आहेत..

मुंबईतील या लोकांना लागली घरांची लॉटरी, यात तुमचे नाव आहे का? येथे क्लिक करून पहा..

Leave a Comment