मुंबईतील या लोकांना लागली घरांची लॉटरी, यात तुमचे नाव आहे का?

मुंबईमध्ये हक्काचे घर (2 BHK Flat Mumbai) खरेदी करायचे असेल तर मोठं बजेट असणं आवश्यक आहे. कारण मुंबईत दिवसेंदिवस घरांच्या किंमती वेगाने वाढताना दिसून येत आहे. मुंबईत सर्वात छोटं घर जरी घ्यायचं असेल तरी लाखो रुपये मोजावे लागतात. घराचे लोकेशन जर मोक्याच्या ठिकाणी असेल तर मग त्याची किंमत कोटीच्या घरात सुद्धा जाते. अशा परिस्थितीत कमी बजेट असणार्‍या लोकांना मुंबईत घर घेता येत नाही. अशा सामान्य परिस्थिती असलेल्या लोकांना मुंबईत हक्काची घरं मिळावी म्हणून सरकार विविध गृह योजनांच्या माध्यमातून (Housing Scheme) परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देत आहे. (Affordable Flats Mumbai)

सरकार पीएम आवास योजना, म्हाडा आणि सिडको या योजनांच्या माध्यमातून पात्र नागरिकांना घरे देत आहे. अलीकडेच मुंबईतील काही नागरिकांना म्हाडाच्या घरांची लॉटरी (Mhada Lottery) लागली आहे. ही घरे नेमकी कोणाला मिळाली? यात तुमचे नाव आहे का? हे आपण पाहणार आहोत.

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

यांना लागली घरांची लॉटरी (Mhada Lottery)

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2020 मध्ये बॉम्बे डाईंग मिल आणि श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांकरिता जाहीर करण्यात आलेल्या लॉटरीमधील यशस्वी असलेल्या पात्र 160 गिरणी कामगार तसेच वारसांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या आहे.

आनंदाची बातमी! नवी मुंबईत सिडको काढणार 5000 स्वस्त घरांची लॉटरी, येथे क्लिक करून पहा सिडकोची ही घरे कुठे असणार?

आठ टप्प्यांमध्ये घराच्या चावीचे वाटप (Mhada Flats Mumbai)

गिरणी कामगारांसाठी 2020 या वर्षात काढलेल्या लॉटरीतील यशस्वी आणि पात्र असलेल्या तसेच घरांच्या विक्री किंमतीचा मुद्रांक शुल्क भरलेल्या 1 हजार 470 एवढ्या गिरणी कामगारांना 15 जुलै पासून आठ टप्प्यांमध्ये घरांच्या चावीचे वाटप करण्यात आलेले आहे. 58 गिरण्यांमधील या अगोदर झालेल्या सोडतींमध्ये यशस्वी न होऊ शकलेल्या एकूण 1,50,484 एवढ्या गिरणी कामगारांची तसेच त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित करण्यासाठी अभियान सुरू असून या अभियानाला 14 जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

मुंबईकरांसाठी सरकारचं मोठं गिफ्ट; म्हाडा संदर्भात सरकारची मोठी घोषणा, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment