खुशखबर! आता या लोकांना पण मिळणार म्हाडाची घरे; या मुंबईकरांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार..!

मुंबई : सध्या मुंबईत घरांचा प्रश्न अतिशय चिंताजनक झाला आहे. मुंबईतील घरे (2 bhk flats Mumbai) सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्यामुळे अशा लोकांसाठी सरकारकडून विविध गृह योजनांची (Housing Schemes) अंमलबजावणी करण्यात येत असून नागरिकांना याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. अशातच आता मुंबईतील नागरिकांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे. आता मुंबईतील नागरिकांना म्हाडाचे घर (Mumbai Mhada Flats) मिळणार आहे. त्यासाठी 28 डिसेंबरला दुपारी 1 वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे. यासाठी 400 घरे उपलब्ध असून आता मुंबईकरांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. ही म्हाडाची घरे नेमकी कोणाला मिळणार? याची माहिती आपण या बातमीत जाणून घेणार आहोत..

मुंबईतील या लोकांना लागली घरांची लॉटरी, यात तुमचे नाव आहे का? येथे क्लिक करून पहा..

म्हाडाच्या मुंबई (Mhada Mumbai) इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाद्वारे बृहतसुचीवरील असलेल्या 265 एवढ्या पात्र अर्जदारांसाठीच्या संगणकीय सोडतीसाठी (Mhada lottery) अखेर आता मुहूर्त मिळाला आहे. 28 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेला म्हाडाच्या वांद्र्यामधील मुख्यालयामध्ये ही संगणकीय सोडत काढली जाणार आहे. आणि त्यासाठी 400 एवढी घरे उपलब्ध झाली आहेत. अनेक वर्षांनंतर काढल्या जाणार्‍या या सोडतीद्वारे वर्षानुवर्षे म्हाडाच्या संक्रमण शिबिरामध्ये वास्तव्य करणार्‍या 265 एवढ्या भाडेकरूंचे आता आपल्या हक्काच्या घराचे (Houses) स्वप्न पूर्ण होणार आहे.

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

दक्षिण मुंबईमधील (South Mumbai) कोसळलेल्या तसेच जुन्या उपकरप्राप्त इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांना दुरुस्ती मंडळाच्या संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित करण्यात येते. संबंधित इमारतीचा जसा जसा पुनर्विकास केला जातो तसे तसे त्या इमारतीतील रहिवासी हक्काच्या घरांमध्ये स्थलांतरीत करण्यात येतात. पण असे देखील काही रहिवासी असतात ज्यांच्या इमारतीचा पुनर्विकास वर्षानुवर्षे केला जात नाही किंवा पुढील काळात म्हणजेच भविष्यात देखील कधी करण्याचे नियोजन राहत नाही. अशा रहिवाशांसाठी संक्रमण शिबिर हा पर्याय असतो. त्यांना संक्रमण शिबिरामध्ये रहावे लागते.

मुंबई जवळ म्हाडाची हजारो घरे, तेही मोक्याची ठिकाणी, येथ क्लिक करून पहा लोकेशनसह किमतीची माहिती..

आजही 35 ते 40 वर्षांपासून संक्रमण शिबिरामध्ये लोक राहात आहेत. अशा संक्रमण शिबिरामध्ये राहणार्‍या लोकांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी रहिवाशांची यादी म्हणजेच बृहत सूची तयार केली जाते आणि त्यांच्याकडून अर्ज घेण्यात येतात. दुरुस्ती मंडळाला पुनर्विकासाच्या माध्यमातून उपलब्ध होत असलेली घरे रहिवाशांना सोडतीच्या माध्यमातून वितरित करण्यात येते. आजपर्यंत दुरुस्ती मंडळाकडून या बृहत सूचीच्या माध्यमातून बर्‍याच रहिवाशांना घरे देण्यात आली आहे.

3 thoughts on “खुशखबर! आता या लोकांना पण मिळणार म्हाडाची घरे; या मुंबईकरांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार..!”

  1. Hamari chaal pura jhuna Ho Gaya 80 90 sal ka Ho Gaya hai please hamare nivedan hai ki yah message CM Sir Tak pahunchaiye please

    Reply

Leave a Comment