खुशखबर! अखेर मुंबईतील या नागरिकांना गुरुवारी मिळणार म्हाडाच्या घरांची चावी, पहा कोणाला मिळणार म्हाडाचे घर?

Mhada flats Mumbai : मुंबईत हक्काचं घर विकत घेण्यासाठी सामान्य लोक मुंबईत दिवस रात्र मेहनत करताना दिसून येतात. मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं आहे हे स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन सामान्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. कारण मुंबईत घर (2 BHK Flats Mumbai) घेण्यासाठी मोठा पैसा मोजावा लागतो. त्यातही घरांच्या मागणीत सातत्याने वाढ होत असल्याने किमतीही वाढत आहे. त्यामुळे पुढील काळ सामान्यांसाठी अजून कठीण राहू शकतो. मात्र, अशा परिस्थितीत मुंबईत घर घेण्यासाठी सरकार तुमची मदत करत आहे. सरकार म्हाडा, सिडको आणि पीएम आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या दरात घरे (Affordable Flats Mumbai) उपलब्ध करून सामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करत आहे. आता 15 फेब्रुवारी रोजी मुंबईकरांना म्हाडाच्या घराची चावी वाटप करण्यात येणार असल्याने त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. घराची चावी नेमकी कोणाला मिळणार? याची माहिती जाणून घेऊया..

काय सांगता! मुंबईत या नवीन लोकेशन वर स्वस्तात 2 BHK फ्लॅट; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह सॅम्पल फ्लॅट..!

या लोकांना 15 फेब्रुवारी रोजी मिळणार घराची चावी

पनवेल जवळ असलेल्या कोन परिसरामधील 2417 एवढ्या घरांच्या सोडतीतील पात्र असलेल्या विजेत्यांची घरांची प्रतीक्षा आता अखेर संपली असून या सोडतीतील घराची संपूर्ण रक्कम भरलेल्या 581 एवढ्या विजेत्यांना 15 फेब्रुवारी म्हणजेच गुरुवार रोजी घराची चावी वाटप करण्यात येणार आहे. वांद्रे येथे असलेल्या समाज मंदिर सभागृह याठिकाणी आयोजित कार्यक्रमामध्ये घरांच्या चाव्या वाटप केल्या जाणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आणि गिरणी कामगार सनियंत्रण समितीकडून चावी वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी मुंबईत सिडकोचे 1 BHK घर अवघ्या 20 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

त्यामुळे आता अनेक वर्षांची घराची प्रतीक्षा करणार्‍या विजेत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 581 एवढ्या विजेत्यांना घराच्या चाव्या देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर पुढील काळात उर्वरित असलेल्या पात्र विजेत्यांनी या घरांची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर त्यांना घराचा ताबा दिला जाणार आहे. अशी माहिती देखील मिळाली आहे.

खुशखबर! मुंबईत म्हाडाची मोक्याच्या ठिकाणी नवीन 86 घरे, येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती..

Leave a Comment