सोयाबीनचे हे वाण बनवतील मालामाल; पहा सोयाबीनचे 5 जबरदस्त वाण..!

आपल्या देशात विशेषकरून महाराष्ट्रात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कमी कष्टात जास्त उत्पादन घेणारे पीक म्हणजे सोयाबीन. त्यामूळे अलीकडे बरेच शेतकरी सोयाबीन पिकाची लागवड करण्याला पसंती देत आहे…

यावर्षी म्हणजेच हंगाम वर्ष 2021-2022 या काळात सोयाबीनला चांगला भाव मिळाला. त्यामूळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आनंदात आहे. आता या खरीप हंगामात देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन लागवड करणार असल्याचं जाणकारांचं मत आहे.

देशातून सर्वाधिक सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो तर सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन मध्यप्रदेशात घेतले जाते. म्हणजेच सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे.

येथे वाचा  – कापसाचे हे टॉप १० बियाणे (वाण) तुम्हाला बनवतील लखपती..!

खरीप हंगामाला काही ठिकाणी सुरवात झालेली आहे तर बहुतांश ठिकाणी शेतकरी अजून मॉन्सूनची प्रतीक्षा करत बसले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 2 ते 3 दिवसात म्हणजेच 12 जून दरम्यान मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यामूळे शेतकर्‍यांनी बियाणे खरेदीला जोमाने सुरुवात केली आहे.

सोयाबीनची पेर करत असलेल्या बर्‍याच शेतकर्‍यांना मात्र सोयाबीनच्या कोणत्या वाणाची लागवड करावी? कोणते वाण सर्वाधिक उत्पादन देणारे आहे? हे माहिती नसते. त्यामूळे हातात पडेल ते वाण घेतल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होऊ शकते.

येथे वाचा  – सोयाबीन, कापसाच्या हमीभावात वाढ, जाणून घ्या यंदा काय मिळणार हमीभाव..!

त्यासाठी आपण घेत असलेले सोयाबीन वाण रोगाशी लडण्यास सक्षम आहे का? काढणीस किती कालावधी लागतो? एकरी किंवा हेक्टरी उत्पादन किती आहे? अजून अशी बरीच माहिती घेऊन वाणाची निवड करणे उत्तम असते. त्यासाठी चांगले उत्पादन देणार्‍या सोयाबीनच्या वाणांबद्दल आपण या लेखात माहिती घेणार आहोत.(These varieties of soybeans will make rich; See 5 great varieties of soybeans)…

(1) KDS – 992
राहूरी कृषी विद्यापीठाद्वारे विकसित
वैशिष्ट्य –
1) तांबेरा रोगाशी लडण्यास सक्षम
2) 100 ते 105 दिवसात काढणीस तयार
3) 11 ते  12 क्विंटल प्रति एकरी उत्पादन (शेतात आधुनिक पद्धतीचा वापर करून एकरी 20 ते 25 क्विंटल उत्पादन शक्य)
4) हे वाण भरघोस उत्पादन देणारे वाण समजले जाते

(2) MAUS – 158
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ द्वारा विकसित
वैशिष्ट्य –
1) लागवड कालावधी – जूनच्या शेवटपासून ते जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत.
2) पेरणीसाठी एकरी 26 किलो बियाणे
3) रोगाशी लडण्यास सक्षम
4) 93 ते 98 दिवसात काढणीस तयार
5) 25 ते  30 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन
6) JS – 335 या वाणापेक्षा अधिक उत्पादन

(3) MAUS – 162
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ द्वारा विकसित
वैशिष्ट्य –
1) पेरणीसाठी एकरी 26 किलो बियाणे
2) रोगाशी लडण्यास सक्षम
3) झाडाच्या शेंड्यापर्यंत शेंगा
4) 100 ते 105 दिवसात काढणीस तयार
5) 25 ते  30 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन (एकरी 9 ते 10 क्विंटल उत्पादन, शेतात आधुनिक पद्धतीचा वापर करून एकरी 15 ते 16 क्विंटल उत्पादन शक्य)

(4) KDS – 726 (फुले संगम)
राहूरी कृषी विद्यापीठाद्वारे विकसित
वैशिष्ट्य –
1) जमीन – मध्यम काळी आणि पाण्याचा निचरा होणारी
1) पेरणीसाठी एकरी 25 किलो बियाणे
2) तांबेरा रोगाशी लडण्यास सक्षम
3) एका झाडाला जवळपास 350 शेंगा
4) 100 ते 105 दिवसात काढणीस तयार
5) 23 ते 25 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन (एकरी जवळपास 10 क्विंटल उत्पादन)

(5) KDS – 344 (फुले अग्रणी)
राहूरी कृषी विद्यापीठाद्वारे विकसित
वैशिष्ट्य –
1) जमीन – मध्यम काळी आणि पाण्याचा निचरा होणारी
2) पेरणीसाठी एकरी 30 किलो बियाणे
3) तांबेरा रोगाशी लडण्यास सक्षम
4) 105 ते 110 दिवसात काढणीस तयार
5) एकरी 8 ते 9 क्विंटल उत्पादन (शेतात आधुनिक पद्धतीचा वापर करून एकरी 14 ते 15 क्विंटल उत्पादन शक्य)

बाजार भाव व शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा..

1 thought on “सोयाबीनचे हे वाण बनवतील मालामाल; पहा सोयाबीनचे 5 जबरदस्त वाण..!”

Comments are closed.