अजब घटना ! रुग्णालयात आॅक्सिजन सिलेंडर न मिळाल्याने पिंपळाच्या झाडाखाली झोपले अन…

दिल्ली : तिलहर मधील चार ते पाच जणांना श्वास घ्यायला त्रास झाल्याने त्यांनी आॅक्सिजन सिलेंडर मिळवण्याचा प्रयत्न केला. खुप प्रयत्न केल्या नंतरही त्यांना आॅक्सिजन सिलेंडर मिळाला नाही. मग ते घरी परतले. घरी परतल्यानंतर त्यांचा त्रास अधिक वाढला नंतर त्यांना कोणीतरी पिपळाचे झाड खुप आॅक्सिजन देतं असा सला दिला. मग ते शाहजहांपुर मधील तिलहर येथील एका झाडा खाली जाऊन झोपले अन…

ही घटना उत्तरप्रदेश मधील शाहजहांपुर जिल्ह्यातील तिलहर तालुक्याची आहे. सध्या रुग्णालयांमध्ये आॅक्सिजन सिलेंडर आणि बेड्स यांचा खुप मोठा तुटवडा जाणवत आहे. आरोग्य सुविधा मिळवणे खुप कठीण होऊन बसले आहे. रूग्णांचे हालाचे बेहाल होत आहे. दरम्यान शाहजहांपुर जिल्ह्यातील तिलहर तालुक्यात चार ते पाच जणांना श्वास घ्यायला त्रास झाल्याने त्यांनी रुग्नालयात धाव घेतली पण त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले. मात्र घरी आल्यानंतर त्यांचा त्रास अधिक झाला. मग त्यांच्या काही हितचिंतकांनी पिंपळाचे झाड चौवीस तास आॅक्सिजन पुरवठा करते असं सांगितलं. नंतर ते तिलहर येथील एका झाडा खाली जाऊन झोपले. त्यांना पाहण्यासाठी लोकांनी तेथे गर्दी करायला सुरवात केली. घरी आपल्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. मात्र आता बरं वाटत असल्याचा दावा त्यांनी केला.

तिलहरचे आमदार रोशनलाल यांना ही बातमी कळली. त्यांना बातमी कळताच ते रूग्णांना भेटण्यासाठी त्याठिकाणी पोहोचले. रूग्णांना आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी आमदारांनी प्रयत्न सुरू केले आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment