हे अँप (App) करणार विजेपासून संरक्षण, मिळणार आधीच संकेत..!

अँप (App) करणार विजेपासून संरक्षण (App protect you from lightning info in Marathi)

दिल्ली : पावसाळ्यात सर्वात जास्त धोका विजेपासून असतो. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला तर याचा अधिकच धोका असतो. जोरदार पाऊस आणि विजेचा कडकडाट होत असताना घरीच राहणे सुरक्षीत असते. विजेपासून वाचण्यासाठी हवामान विभागाने सांगितलेले नियम पाळणे गरजेचे असते. आता पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ़ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी या संस्थेने लोकांना विजेपासून वाचवण्यासाठी एक अँप विकसीत केले आहे. या अँप चे नाव आहे दामिनी. हे अँप केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली IITM पुणे यांनी बनवले आहे.

अमित शाह यांनी यासंदर्भात दिल्ली मध्ये एक महत्वाची बैठक घेतली. त्या बैठकीला गृह मंत्रालय, हवामान विभागाचे अधिकारी आणि जलशक्ती मंत्रालय हजर होते. या अँप कडून मिळणारे संकेत ओळखून आपन आपले प्राण वाचवू शकतो. बैठक पार पडल्यानंतर अमित शाह यांनी लोकांनी हे अँप वापरावे असा आग्रह केला आणि अँप संदर्भात थोडक्याट माहिती दिली. (After the meeting, Amit Shah urged the people to use Damini app)

असे काम करते ‘दामिनी अँप


दामिनी अँप 40 किलोमीटर अंतराच्या आतील माहिती देते. आपन ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून 40 किलोमीटर अंतरात वीज पडण्याची शक्यता असल्यास हे अँप वेळेआधी लगेच आपल्याला संकेत देते आणि काय खबरदारी घ्याल? याची देखील या अँप मध्ये माहिती देण्यात आलेली आहे. हे अँप बनवण्यासाठी पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ़ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी या संस्थेने (IITM PUNE) देशातील एकून 48 सेंसरची मदत घेतली आहे.

अँप असे डाउनलोड करा (Download Damini App info in Marathi)


एंड्रॉइड फोन असेल तर हे अँप प्ले स्टोर वरून डाउनलोड करता येते. डाउनलोड केल्यानंतर त्या मध्ये आपली वैयक्तीक माहिती आणि लोकेशन भरावे लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर हे अँप काम करेल. हे अँप प्ले स्टोर वर कसे दिसते? हे खाली दिलेल्या फोटोत आपन पाहू शकता. 5 लाख प्लस या अँपचे आतापर्यंत डाउनलोड झालेले आहे. फक्त 4.6 MB चे हे अँप आहे आणि 3.4 स्टार या अँपला मिळालेले आहे.

संकेत मिळताच काय खबरदारी घ्याल?
वीज पडण्याचे संकेत मिळताच खबरदारी घ्या. झाडाखाली, पर्वतीय भाग तसेच मोकळ्या शेतात उभे राहू नये. ज्या ठिकाणी पाणी साचलेले असेल त्या ठिकाणी उभे राहने ठाळा. महिलांनी अशा वेळेत धातूची भांडी घासू नये. खबरदारीचा उपाय म्हणून घरीच राहने सुरक्षित आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment