दिवाळीत नवीन घर खरेदीसाठी मुंबईतील या भागाला लोकांची सर्वाधिक पसंती, पहा स्वस्त घरं कुठे?

मुंबई : चालू वर्षांमध्ये मुंबई सोबतच महामुंबई मध्ये गृह विक्रीने या ठिकाणी चांगलाच जोर धरला आहे. मागील सलग तीन महिन्यांमध्ये मुंबईमधील गृह विक्रीने (2 bhk Flat In Mumbai) तब्बल दहा हजार घरांचा टप्पा ओलांडला आहे. अशावेळी शुक्रवारी भारतीय रिझर्व बँकेच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या पतधोरणाच्या अंतर्गत चौथ्यांदा व्याजदर पूर्णपणे स्थिर ठेवले आहेत. आगामी कालावधीमध्ये दसरा तसेच दिवाळी हे सण आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित कसे करता येईल यासाठी बिल्डर आकर्षक योजना सादर करण्यावर भर देत आहेत. याचा सुद्धा थेट परिणाम गृह विक्री वाढीवर होईल. म्हणजेच सणासुदीमध्ये घरांची विक्री मोठ्या प्रमाणावर होईल.

सर्वाधिक मागणी पश्चिम उपनगरात;

मुंबईमध्ये सातत्याने विकास कामे सुरूच आहेत. त्यामधील मेट्रोच्या महत्त्वाच्या टप्प्याचे काम सुद्धा मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. ज्या लोकांची कार्यालय किंवा कामाचे ठिकाण पश्चिम उपनगरामध्ये आहे किंवा ज्या नागरिकांना कार्यालयापर्यंत जाण्यासाठी मेट्रोचा प्रवास करावा लागतो अशा लोकांनी आता त्याच परिसरामध्ये घर खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. चालू वर्षांमध्ये बघितले तर मुंबई शहरात 31 टक्के घरांची विक्री फक्त पश्चिम उपनगरात झाल्याचे आपल्याला दिसून आले आहे. तर अशावेळी पूर्व उपनगरात सुद्धा विकास कामे जोमात सुरू आहेत. त्यामुळे घरांच्या मागणी दिवसेंदिवस वाढत आहेत. (2 bhk flat in mumbai).

मुंबईत याठिकाणी मिळणार बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

टू बीएचके तसेच थ्री बीएचके घरांना सर्वाधिक मागणी (2/3 bhk flat in Mumbai)

मागील दोन वर्षांपासून जे नागरिक घर खरेदी करण्यास इच्छुक आहेत. त्यांचा कल सध्या बदलला आहे. आता या नागरिकांना टू बीएचके, थ्री बीएचके अशा घरांची खरेदी करण्याची उत्सुकता लाभली आहे. ज्या नागरिकांचे सध्या बघितले तर वन रूम किचन अशा प्रकारचे घर आहेत. अशा सर्व लोकांचा कल मोठ्या घरांच्या खरेदीकडे वाढला आहे.

म्हाडाचं सर्वात मोठं घर डोंबिवलीत; अर्ध्या किंमतीत घर मिळणार? येथे क्लिक करून पहा बातमी..

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर होईल नवनवीन घराचे बुकिंग;

भारतीय रिझर्व बँकेच्या माध्यमातून मे 2022 पासूनच सादर केलेल्या सलग अशा पाच पतधोरणामध्ये असलेल्या व्याजदरात वाढ करत असताना ते अडीच टक्क्यांनी वाढवले गेले. यामध्ये व्याजदर वाढीचा फटका हा थेट गृह विक्री करणाऱ्या नागरिकांना बसला. असा अंदाज कित्येक तज्ञ लोकांनी वर्तवला. परंतु लोकांच्या क्रयशक्तीमध्ये चांगलीच वाढ होत आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये सुद्धा हा व्याजदर तितकाच पचवावा लागला.

बाप रे! ठाण्यातील म्हाडाची घरे झाली महाग..पहा किती लाखांनी वाढवली किंमत..!

आगामी कालावधीमध्ये दसरा तसेच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर तसेच मुंबई परिसरामधील विकासक हे नवनवीन प्रकल्पांची घोषणा करतील. यासोबतच विद्यमान प्रकल्पामध्ये सुद्धा काही सूट योजना सणासुदीच्या कालावधीमध्ये जाहीर करू शकतील. त्यामुळेच आता अशा कालावधीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना घरांचे बुकिंग करता येईल आणि नवीन घरामध्ये शिफ्ट होत येईल.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? पहा कामाची माहिती..!

2 thoughts on “दिवाळीत नवीन घर खरेदीसाठी मुंबईतील या भागाला लोकांची सर्वाधिक पसंती, पहा स्वस्त घरं कुठे?”

Leave a Comment