शेतकर्‍यांनो ! गाईची ही जात देते सर्वात जास्त दूध; शेतीसाठी जोडधंदा म्हणून करा पालन..!

Read Marathi Online : ‘गाय’ म्हणजे माय अशी उपमा आपल्या संस्कृती मध्ये गाईला दिलेली आहे. तसेच ‘गो’ पालन शेतकऱ्यांसाठी किंवा इतर बेरोजगार तरुणांसाठी एक भरपूर उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे. भविष्यातही गोपालन तरुण वर्गासाठी उत्तम व्यवसाय ठरणार आहे.

गाईच्या गोमूत्राचा आणि शेणाचा जैविक शेती साठी खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. तसेच गाईचे दूध आरोग्यासाठी वरदान आहे. वरील सर्व कारणांमुळे गाय ही माय आहे. पण गोपालन करण्याआधी सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, की कोणती गाय पाळावी? कुठल्या जातीची गाय दूध जास्त देते? जेणेकरून गोपालनातून नफ्याचे प्रमाण वाढेल. तर आता आपण जाणून घेणार आहोत भारतातील अशी कुठली गाय आहे जी गोपालनासाठी उत्तम आहे, तसेच दूध पण जास्त देते. दुध जास्त देण्याबरोबरच या गाईचे बैल शेती कामासाठी सुद्ध वापरले जातात.

येथे वाचा  – शेतकर्‍यांनो ! कमी वेळात पैसाच पैसा; शेळी पालनासाठी करा फक्त ‘या’ पाच जातींची निवड..!

डांगी गाय (सर्वात जास्त दूध देणारी गाय)

सर्वात जास्त दूध देणाऱ्या गाई पैकी डांगी ही एक चांगली गाय आहे. मूळच्या गुजरातमधील डांग या भागात ही गाय आढळत असल्यामुळे या गायीचे नाव “डांग” असे पडले. गुजरात पाठोपाठ ही गाय महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक आणि पश्चिम घाटामध्ये पाळली जाते. ही गाय दूध जास्त देत असल्यामुळे, गोपालन साठी शेतकऱ्यांची ही प्राथमिक पसंतीची आहे.

या गाईचे वर्णन करायचे झाल्यास, या गाईचे कान आणि डोके लहान आहे, शिंगे लहान आणि जाड आहे. खांद्याचा आकार मध्यम असून, मानेची कवळी लोम्बलेली आहे. या गाईचे खास वैशिष्ट्ये असे की या गाईच्या शरीरावर काळे आणि लाल डाग असतात. तसेच या गाईचे शरीर इतर गायींच्या तुलनेत मध्यम स्वरूपाचे आहे. वरील कारणांमुळे ही गाय बाकीच्या गाईंपेक्षा वेगळी ठरते.

गाईसाठी लागणार चारा

ही गाय दूध जास्त देत असल्यामुळे निश्चितच या गाईला पौष्टिक खाद्य आणि हिरवा चारा देने गरजेचे आहे.
हिरव्या चाऱ्यामध्ये ही गाय नेपियर, सुदान गवत, बाजरी, हत्ती गवत, गवार चा पाला, चवळी चा पाला इ. हिरवे चारे खाते. तसेच दाना मध्ये कोंडा, तांदूळ, ढेप, डाळींचा चुरा, भुईमूग, ज्वारी बाजरी, हरबरा, गहू, मका इ. धान्य खाते.

येथे वाचा  – सोयाबीनचे हे वाण बनवतील मालामाल; पहा सोयाबीनचे 5 जबरदस्त वाण..!

100 ते 400 दिवस दूध देण्याची या गायीची क्षमता आहे. इतर गायींच्या तुलनेत ही गाय सरासरी जास्त दिवस दूध देते. तसेच या गायीच्या दुधातील फॅट चे प्रमाण 4.3% एवढे आहे. ही गाय दिवसाला जवळ जवळ  40 लिटर  दुध देते. त्यामुळे ही गाय सर्वात जास्त दूध देणारी गाय आहे.

शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा