सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला ‘हा’ निर्णय, पहा सोयाबीनचे आजचे दर..!

शेअर करा

शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामाला आता सुरवात झालेली आहे. बर्‍याच शेतकर्‍यांनी पेरणीचा श्रीगणेशा केला आहे. अशातच अजून काही शेतकर्‍यांजवळ सोयाबीन पडून आहे. मे महिना उलटून जूनचा एक आठवडा देखील होऊन गेला आहे तरी पण सोयाबीनला हवा तो दर मिळत नसल्याने विक्रीचं काय करावं? अशा गोंधळात सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी सापडला आहे.

पावसाळा सुरू झाल्याने शेतकर्‍यांकडे व्यवस्थित साठवणूक करण्याची सुविधा नसल्यामुळे काही शेतकर्‍यांनी सोयाबीन विक्री करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. सोयाबीनला हवा तो दर मिळत नसल्याने आणि पावसाळ्यात पाण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी साठवणूकीची व्यवस्था होत नसल्याने त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्यच असावा असं वाटतय..

येथे वाचा  – सोयाबीनचे हे वाण बनवतील मालामाल; पहा सोयाबीनचे 5 जबरदस्त वाण..!

त्यासाठी शेतकर्‍यांना सध्या सोयाबीनला काय दर मिळतोय? याची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून आपण या लेखात सोयाबीनचे ताजे बाजार भाव देखील पाहणार आहोत.

आज (10 जून रोजी) सोयाबीनची कोणत्या बाजार समितीत किती आवक आली? आणि सोयाबीनला जास्तीत जास्त दर, कमीत कमी दर व सर्वसाधारण दर काय मिळाला? याची माहिती आपण आकडेवारीच्या स्वरूपात जाणून घेणार आहोत.

येथे वाचा  – सोयाबीन, कापसाच्या हमीभावात वाढ, जाणून घ्या यंदा काय मिळणार हमीभाव..!

चला तर मग जाणून घेऊया आजचे ताजे सोयाबीन बाजार भाव

आजचे सोयाबीन बाजार भाव दि.10 जून 2022 वार – शुक्रवार | Soybean Bajar Bhav

(1) उदगीर  :
दि. 10 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 1850 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 6850
जास्तीत जास्त दर – 6866
सर्वसाधारण दर – 6858

(2) सोलापूर  :
दि. 10 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 35 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 6305
जास्तीत जास्त दर – 6645
सर्वसाधारण दर – 6400

(3) राहूरी – वांबोरी :
दि. 10 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 10 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 4900
जास्तीत जास्त दर – 5400
सर्वसाधारण दर – 5150

(4) श्रीरामपूर :
दि. 10 जून 2022 (वार – शुक्रवार)
शेतमाल – सोयाबीन
आवक  – 30 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 5500
जास्तीत जास्त दर – 6300
सर्वसाधारण दर – 6000

आजचे सर्व सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..

आजचे सोयाबीन बाजार भाव

शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेतीविषयक महत्वाची माहिती दररोज मिळवण्यासाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या…धन्यवाद.