लय भारी ! कापसातील बोंड अळीचा हे औषध करणार नायनाट, एकही अळी राहणार नाही शिल्लक, उत्पादनात होईल वाढ..!
ReadMarathi.Com : या वर्षीच्या खरीप हंगामात बळीराजाने मागच्या हंगामाच्या तुलनेत पांढऱ्या सोन्याची(cotton) ची लागवड वाढवली आहे. याचे मुख्य कारण आहे कापसाला मिळालेला विक्रमी दर. पण कापसाला मिळणारा दर जरी विक्रमी असला तरी कापसाचे प्रति एकर उत्पादन कमीच आहे.
उत्पादन कमी मिळण्या मागे भरपूर कारणे आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ. यासोबतच कीड आणि रोग यांचा ही कापूस उत्पादन घट होण्यामागे सिंहाचा वाटा आहे.
मागच्या काही वर्षात जर बघितले तर असे दिसते की, किडींकडून होणाऱ्या नुकसानीत बोंड अळी कापसाचे सर्वात जास्त नुकसान करते. नुकसानी सोबतच कापसाची क्वालिटी पण खराब होते.
कापसाची क्वालिटी खराब झाल्यामुळे चांगल्या गुणवत्तेच्या कापसाच्या तुलनेत या खराब कापसाला कमी दर मिळतो. या मुळे शेतकऱ्याचे अधिकचे नुकसान होते. तर हे नुकसान टाळण्यासाठी या शत्रू कीड बोंड अळीचा संपूर्ण नायनाट कसा करावा हे आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव फुले लागण्याच्या अवस्थेपासून सुरू होतो. बोंड अळी प्राथमिक अवस्थेत फुलाच्या आतील भाग खाऊन तिची बाल अवस्था पूर्ण करते. दरम्यान ती फुलाच्या पाकळीची डोम कळी बनवते. या नंतर बोंडात शिरून आतून बोंड खाते, बोंड फुटल्यानंतर कमी गुणवत्तेचा कापूस तयार होतो.
म्हणून, या बोंड अळीचे नियंत्रण करण्यासाठी निंबोळी बियांच्या अर्कापासून तयार केलेले जैविक कीटकनाशक यांचा वापर फायद्याचा ठरत आहे. निंबोळी अर्क सतत फवारल्यास कापसावरील बोंड आळीच नाही तर इतर रस शोषक किडींवर पण ताबा मिळवता येतो.
शुद्ध स्वरूपातील निंबोळी अर्क 3-4 ml प्रति लिटर पाण्यात फवारल्यास चांगले परिणाम दिसून येतात. या मुळे बोंड अळीचा नायनाट होतो. हे जैविक असल्यामुळे मित्र कीटकांना काहीच नुकसान होत नाही.
त्या सोबतच शेतकरी लाईट ट्रॅपचा (Light Trap) पण उपयोग करू शकता. हे केल्यानंतर उत्पादनात नक्कीच वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, अशाच शेती विषयक महत्त्वाच्या माहितीसाठी ReadMarathi.Com ला नियमित भेट द्या…
Very important information