बाप रे ! ‘या’ शेतकर्‍याने 12 गुंठ्यात घेतले 4 लाख रुपयांचे उत्पन्न, पहा कशाची करतो शेती..!

आज शेती म्हटलं की बर्‍याच लोकांना हा व्यवसाय खूप कमी उत्पादन देणारा व्यवसायात वाटतो. काहींना तर शेती व्यवसाय नकोसा वाटतो. पण अलीकडे आपल्याला अशा अनेक शेतकर्‍यांच्या यशस्वी स्टोरी ऐकायला मिळतात की ज्यांनी विदेशातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून आधुनिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली आणि कोटीने रुपये कमावले.(This farmer earned Rs. 4 lakhs in 12 guntas, see what farming does?)…

काही उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांनी तर रेकॉर्ड तोड उत्पन्न घेतल्याचं आपण पाहिलं आहे. त्यामूळे शेती व्यवसाय करून आपण खूप मोठे उत्पन्न घेऊ शकतो हे बर्‍याच शेतकर्‍यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आज आपण अशाच एका शेतकर्‍याची माहिती घेणार आहोत की ज्याने फक्त आपल्या 12 गुंठा जमिनीवर 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

हे पण वाचा

या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीची शेती करून कमावले 4 लाख रुपये (strawberry farming in Marathi)

मित्रांनो, या शेतकर्‍याचे नाव सचिन सुर्यवंशी असे आहे, या शेतकर्‍याने आपल्या 12 गुंठा जमिनीमध्ये 4 लाख रुपयाचे स्ट्रॉबेरीचे पीक काढून दाखवले आहे. ज्या ठिकाणी काही शेतकरी आपल्या पाच एकरांत देखील एवढे उत्पन्न घेऊ शकत नाही तेव्हढे उत्पन्न सचिन यांनी 12 गुंठे जमिनीवर घेऊन दाखवले आहे.

सचिन सुर्यवंशी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तोरंबा तालुक्यातील रहिवासी. सातारा जिल्ह्यात काही दिवस वास्तव्यास असलेल्या सचिन सुर्यवंशी यांनी आपले मित्र करत असलेल्या स्ट्रॉबेरी शेतीची माहिती घेतली आणि स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग उस्मानाबाद जिल्ह्यातील तोरंबा तालुक्यात असलेल्या आपल्या 12 गुंठा जमिनीवर करून बघितला आणि तो प्रयोग यशस्वी झाल्याचं सुर्यवंशी सांगतात.

स्ट्रॉबेरी शेतीसाठी अनुकूल वातावरण असलेल्या महाबळेश्वर पेक्षाही अधिक उत्पन्न घेतल्याची माहिती सचिन सुर्यवंशी यांच्याकडून मिळाली. सचिन सुर्यवंशी यांच्या या यशस्वी प्रयोगाची चर्चा तोरंबा तालुक्यात सर्वत्र सुरू आहे. सचिन यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार त्यांनी सप्टेंबर मध्ये या पिकाची लागवड केली होती. सध्या स्ट्रॉबेरीची 200 ते 250 रुपये प्रतिकिलोने उस्मानाबाद आणि सोलापूर बाजार पेठेत विक्री सुरू असल्याचं ते सांगतात.

मित्रांनो, हा लेख आपल्याला प्रेरणादायी वाटला असेल तर आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा… 

Leave a Reply

Your email address will not be published.