मुंबईकरांनो! सिडकोच्या घरासाठी अर्ज करताय? आता ही नवीन सुविधा झाली सुरू..!

नवी मुंबई : प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून सिडकोने 3322 घरांची लॉटरी (Cidco Lottery 2024) जाहीर केली. पण या सिडकोच्या घरांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ही घरे विकली जावी म्हणून सिडकोच्या संबंधित विभागाकडून अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आता नवी मुंबईतील सिडकोची घरे (Cidco Flats Navi Mumbai) विकण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सिडकोकडून एक नवीन सुविधा सुरू करण्यात आली आहे. आता या सुविधेमूळे सिडकोच्या घरासाठी अर्ज करणार्‍यांना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया यासंदर्भात माहिती..

मागील 5 वर्षांमध्ये सिडकोने वेगवेगळ्या घटकांकरिता वेगवेगळ्या गृह योजनेतून (Housing Schemes) जवळपास 30 हजार एवढ्या घरांची योजना जाहीर केली आहे आणि त्यांची संगणकीय सोडत सिडकोकडून काढण्यात आली आहे, पण काही कारणांमुळे सिडकोची हजारो घरे विक्री न होता तशीच पडून आहेत. या घरांपैकी सर्वात जास्त घरे तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये आहेत. आता याच घरातील 3322 घरांची योजना प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर जाहीर करण्यात आली आहे. या उपलब्ध घरांपैकी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या घरांना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पण सर्वसाधारण घटकांसाठी असलेल्या घरांना ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचं समोर आलं आहे.

नवी मुंबईत सिडकोचे 1 BHK घर अवघ्या 20 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

घरासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी ही नवीन सुविधा सुरू

त्यामुळे या घरांची विक्री व्हावी या हेतूने सिडकोकडून तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी एक सुविधा सुरू केली आहे. किओस्क बुकिंग काउंटर अशी ही सुविधा आहे. या काउंटरवर प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. या बुकिंग काउंटरमूळे ग्राहकांना मार्गदर्शन मिळणार आहेत. त्यासोबतच ग्राहकांना योजनेची माहिती देऊन अर्जनोंदणीसाठी सहकार्य करण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांना घरासाठी ऑनलाइन नोंदणी करत असताना काही वlअडचणी येत असतील तर अशा अर्जदारांना किओस्क बुकिंग काउंटरकडून मदत मिळणार आहे..

खुशखबर! महामार्गावर मिळणार म्हाडाचे स्वस्त घर; म्हाडाने उचलले ‘हे’ पाऊल, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment