गृहप्रवेशासाठी आता दिवाळीचा मुहूर्त; एवढ्या लोकांना मिळणार म्हाडाच्या घराच्या चाव्या..!

Mhada Flat Mumbai : मुंबई मंडळाच्या लॉटरी मधील विजेत्यांना तात्पुरते देकारपत्र मिळाल्याच्यानंतर 100 टक्के रक्कम भरल्यानंतर दसर्‍याच्या मुहूर्तावर घराचा ताबा देण्यात येईल, असा दावा ‘म्हाडाकडून (Mhada) करण्यात आला होता. पण दसर्‍याचा मुहूर्त हुकल्यानंतर आता दिवाळीचा मुहूर्त हुकू नये याकरिता ‘म्हाडा’च्या माध्यमातून आज सकाळी विशेष मोहीम राबवण्यात येणार होती अशी माहिती मिळाली आहे.

Mhada Flat Mumbai

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 4,082 एवढ्या सदनिकांच्या विक्रीसाठी 14 ऑगस्टला सोडत काढण्यात आली होती. देकारपत्र मिळाल्यानंतर बर्‍याच जणांनी 25 टक्के रक्कम भरण्यापासून बँकेचे लोन (Bank Loan) घेण्यासाठी धावपळ सुरू केली. लवकरात लवकर घराचा ताबा मिळावा या आशेने काही जणांनी पैशांची जुळवाजुळव करून शंभर टक्के रक्कम भरली आहे.

खुशखबर! म्हाडाच्या या घरांची 70 टक्के दुरुस्ती पूर्ण; दिवाळीनंतर एवढ्या लोकांना मिळणार घराची चावी, येथे क्लिक करून पहा बातमी..

आज एवढ्या विजेत्यांना ताबापत्र

मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 110 एवढ्या विजेत्यांना ताबापत्र मिळाली असून गुरुवारी म्हणजेच आज विशेष मोहिमेत अजून 100 विजेत्यांना ताबापत्र देण्यात येणार आहे. त्याकरिता संबंधित विजेत्यांना सिस्टमद्वारे मेसेज पाठविले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपॉइंटमेंट मिळालेल्या विजेत्यांनाच ताबा पत्राचे वाटप करण्यात येणार, अशी माहिती मिळाली होती. ताबापत्र मिळाल्याच्या नंतर विजेत्यांना स्टॅम्प डयुटी आणि रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यानंतर कार्यकारी अभियंत्यांकडून घराच्या चाव्या देण्यात येणार आहे.

काय सांगता! आता म्हाडाचे घर विकण्यासाठी खासगी कंपनी मैदानात; आता घरांच्या किमतीत झाला मोठा बदल, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment