यंदा ‘या’ तारखेपासून सुरू होणार पेरणी, पहा असा असेल पावसाचा प्रवास..!

Read Marathi Online : भारतातील मोठ्या क्षेत्रावरील शेती ही मान्सूनच्या पावसाच्या आधारे होत असते. त्यामुळे मान्सून कसा असेल याची चिंता सर्व शेतकऱ्यांना असते. सध्या सर्व शेतकरी शेतातील माल काढून शेतातील काडी कचरा जाळणे आणि शेताची नांगरणी करणे या कामात व्यस्त आहे. पण त्याच बरोबर शेतकऱ्याला येणाऱ्या वर्षातील मान्सून बद्दलची चिंता सतावत असते. कारण शेतकऱ्याचे सर्व काही मान्सून वरच अवलंबून असते. त्यासाठी येत्या दिवसांत हवामान काय असेल हे शेतकर्‍यांसाठी जाणून घेण खूप महत्त्वाचं असतं म्हणून या लेखात आपन 2022 चा मान्सून अंदाज जाणून घेणार आहोत. 

महाराष्ट्राचे प्रसिद्ध हवामान अंदाजक श्री पंजाब डख यांनी नुकत्याच एका भाषणामधे शेतकऱ्यांना संबोधित करीत असताना 2022 या वर्षाचा मान्सून अंदाज सांगितला तसेच मान्सून चा प्रवास कसा असेल या बद्दल पण सविस्तर माहिती दिली. या वर्षी समाधान कारक पाऊस होणार असून शेतकरी रब्बी हंगामाची पिके पण घेऊ शकणार आहे. पावसाचा अंदाज समाधानकारक असल्याने त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन करावे.

या तारखेला धडकणार मान्सून

पेरणीच्या दिवसांमध्ये पाऊस नेमका केव्हा बरसणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वच शेतकरी बांधवांना असते. कारण शेतकर्‍यांसाठी पेरणीचे दिवस खूप महत्वाचे असतात. त्यादरम्यान जर पावसाने 15 ते 20 दिवसांची दांडी मारली तर शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट असते. त्यासाठी हवामानाचा आढावा घेऊन जर पेरणी केली तर दुबार पेरणी सारखे मोठे संकट आपल्याला टाळता येऊ शकते.

पंजाब डख यांच्या मते मान्सून महाराष्ट्रामध्ये 2, 3 आणि 4 जून दरम्यान दाखल होणार आहे. या दरम्यान काही शेतकरी पेरणी करू शकता. जे शेतकरी सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेऊ इच्छिता त्यांनी 4 जून नंतर पेरणी करायचे नियोजन करावे. या नंतर 18, 19 ते 20 जून दरम्याम पाऊस पडणार आहे. या दरम्यान काही शेतकरी पेरणी करू शकता. नंतर 2 ते 4 जुलै ला भरपूर पाऊस पडणार आहे. राहिलेल्या सर्व शेतकर्‍यांनी या दरम्यान पेरणी आटोपून घ्यावी.

पुढे असा असेल पावसाचा प्रवास

ऑगस्ट महिन्यामध्ये भरपुर पावसाचा अंदाज आहे. त्यापेक्षाही सप्टेंबर महिन्यामधे ऑगस्ट महिन्या पेक्षाही जास्त पाऊस पडणार आहे. याची दक्षता सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी. अश्या प्रकारे 2022 या वर्षामधे पाऊस हा समाधान कारक स्वरूपाचा असल्याने शेतकऱ्यांसाठी ही खूप जास्त आनंदाची बातमी आहे. या मुळे शेतकऱ्यांना नक्कीच भरपूर उत्पादन होणार आहे.

या तारखे पासून सुरू होईल रब्बी ची पेरणी

महाराष्ट्रात 28 अक्टोबर पासून थंडी पडायला सुरुवात होणार असून रब्बी पेरणीला 28 तारखेनंतर सुरुवात होईल असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे..

हवामान अंदाज व बाजार भाव माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

One thought on “यंदा ‘या’ तारखेपासून सुरू होणार पेरणी, पहा असा असेल पावसाचा प्रवास..!

Leave a Reply

Your email address will not be published.