मुंबई जवळ म्हाडाची हजारो घरे, तेही मोक्याची ठिकाणी, पहा लोकेशनसह किमतीची माहिती..!

मुंबई : म्हाडा कोकण मंडळाला येत्या नवीन वर्षात चितळसर मानपाड्यामधील स्विस चॅलेंज प्रकल्पामधून 1 हजार 173 एवढी घरे (2 bhk flat in mumbai) उपलब्ध होणार अशी माहिती मिळाली आहेत. सध्याच्या काळात या प्रकल्पाचे 90 टक्के एवढे काम पूर्ण झालेले आहे. याठिकाणी पाणीपुरवठासंदर्भात असलेला प्रश्न सुटल्यानंतर ही घरे सोडतीमध्ये समाविष्ट करण्याचा महत्वाचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला आहे. (Ready to move flat in Mumbai).

चितळसर मानपाडा याठिकाणी असलेल्या म्हाडाच्या जमिनीवर ‘स्विस चॅलेंज पद्धती’नुसार प्रकल्प राबविला जाणार आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे. म्हाडा (Mhada) आणि खासगी विकासक यांच्याकडून अशा प्रकारचा प्रकल्प राबविण्यात येतो. यात जमीन म्हाडाची असते तर घरांची निर्मिती करणे तसेच गृह प्रकल्पाची संपूर्ण अंमलबजावणीचे काम खासगी विकासकांकडून केले जाते. या पद्धतीनुसार 2007 मध्ये हा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. यात म्हाडाला प्रकल्पाचा 35.5 टक्के एवढा हिस्सा तर खासगी विकासकाला 64.5 टक्के एवढा हिस्सा दिला जाणार आहे.

आतापर्यंत या प्रकल्पाला (Housing Project) पंधरा वर्षे पूर्ण झाली असली तरी देखील अजूनपर्यंत कोकण मंडळाला आपला हिस्सा असलेली 1 हजार 173 एवढ्या घरांची प्रतीक्षा आहे. पण आता या घरांचे बांधकाम लवकरच पूर्ण होण्याच्या दिशेने असल्यामुळे ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार असल्याचं दिसतय. कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही महिन्यांमध्ये ही घरे कोकण मंडळाच्या ताब्यामध्ये येणार आहे.

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

ही 1 हजार 173 घरे येत्या काळात ताब्यामध्ये घेऊन सोडतीत समावेश करण्याचा मानस मंडळाचा आहे. पण आतापर्यंत या प्रकल्पामध्ये पाणीपुरवठ्याची व्यवस्था झालेली नाही. म्हणून यासाठी ठाणे महापालिकेकडे पाठपुरावा सुरू असल्याचं अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे.

35 लाखांत फ्लॅट (2 bhk flat Mumbai)

चितळसर मानपाडा येथील ही 1 हजार 173 घरे अल्प गटाकरिता असून या घरांचे क्षेत्रफळ 340 चौरस फूट एवढे आहे. या घरांची अंदाजित विक्री किंमत 35 लाख एवढी सांगण्यात येत आहे.

घरांची लॉटरी काढण्यासाठी ‘म्हाडा’ला मुहूर्त मिळाला? येथे क्लिक करून पहा काय आहे नवीन अपडेट..!

1 thought on “मुंबई जवळ म्हाडाची हजारो घरे, तेही मोक्याची ठिकाणी, पहा लोकेशनसह किमतीची माहिती..!”

Leave a Comment