अरे वा! आता म्हाडाची हजारो घरे परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार; सामान्यांना मिळणार स्वस्त घरे, पहा बातमी..!

मुंबई : अनेकांची पुण्यात व मुंबईत घर (1 BHK Flats Mumbai) खरेदी करण्याची इच्छा असते. अलीकडच्या काळात मुंबई पुण्यात घर विकत घेण्याचा लोकांचा ट्रेंड वाढत चालला आहे. या नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच जानेवारी महिन्यात एकट्या मुंबईत तब्बल 10 हजार 466 एवढ्या घरांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात फक्त 9 हजार घरांची विक्री झाली होती. म्हणजे मुंबईत घर (2 BHK Flats Mumbai) खरेदी करण्याचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत आहे. करोनानंतर भाड्याच्या घरात राहण्याऐवजी स्वतःचे घर खरेदी करण्याला पसंती वाढली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून घर विक्रीत चांगलीच वाढ होताना दिसत आहे. असे असताना देखील सामान्य माणसांना मुंबई पुण्यात घर घेणे अवघड जाते. घरांच्या किंमती जास्त असल्याने घर खरेदी करण्यासाठी सामान्यांकडे तेवढे पैसे नसतात. त्यामूळे सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होत नाही. पण आता परवडणाऱ्या दरात म्हाडाची हजारो घरे (Mhada Flats) उपलब्ध होणार असल्याने हजारो नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेमध्ये 20 टक्के एवढे घरे माफक दरामध्ये विकण्याचे बंधन असताना देखील ती घरे विकासकांकडून परस्पर लाटल्याचे उघड झाल्यानंतर आता ही घरे स्वतंत्र भूखंडावर घेण्याचे म्हाडाकडून ठरविण्यात आले आहे. परिणामी आता विकासकांना चटईक्षेत्रफळाचा लाभ उठविताना ही घरे म्हाडाकडे सुपूर्द करावी लागणार आहेत. त्यामुळे आता सामान्यांसाठी परवडणाऱ्या किमतीत हजारो घरे उपलब्ध होणार आहेत.

खुशखबर! मुंबईत सिडकोचे घर फक्त 22 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती

मुंबई म्हाडा लॉटरी 2024 (Mumbai Mhada Lottery 2024)

मुंबईतील सामान्यांना म्हाडाच्या लॉटरीतून घर मिळावे अशी अपेक्षा असते. त्यामुळे म्हाडाच्या लॉटरीकडे लोकांचे लक्ष लागलेले असते. येत्या काळात लवकरच मुंबईत म्हाडाची लॉटरी (Mumbai Mhada Lottery 2024) येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने मुंबईकरांना पुन्हा स्वस्तात घर घेण्याची संधी मिळणार आहे. मुंबईतील म्हाडा लॉटरीच्या महत्वाचे अपडेट मिळवत राहण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा..

मुंबईत फक्त 18 लाखात घर; हाय वे शेजारी बजेटमध्ये घर, येथे क्लिक करून पहा सॅम्पल फ्लॅट..!

Leave a Comment