आज राज्यात गारपिटीची शक्यता, मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा..!

सर्व शेतकरी मित्रांचं शेतीविषयी माहिती देणार्‍या आपल्या Read Marathi या वेबसाइटवर स्वागत आहे. ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये शेतमाल उभा आहे किंवा शेतात पडलेला आहे, अशा शेतकरी बांधवांसाठी हा हवामान अंदाज खूप महत्वाचा आहे.

हवामान अंदाज, शेतमालाचे ताजे बाजार भाव आणि शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप आणि Telegram चॅनेल जॉईन करा…

Sheti Marathi Telegram Channel

पावसाच्या सततच्या हजेरीने शेतकरी आता हैराण झाला आहे. अगोदर पीक फुलं लागण्याच्या अवस्थेत असताना ढगाळ वातावरण व धुक्यांमूळे नुकसान झाले, आता अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे होत आहे. या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. या अवकाळी पावसाने कांदा, हरभरा व सोयाबीन या पिकांचे महाराष्ट्रभर खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बॅंकांच घेतलेलं कर्ज आता कसं फेडाव? असा प्रश्न एका शेतकर्‍याने न्यूज मीडियाशी बोलताना उपस्थित केला.(Today the possibility of hailstorm in the state, a warning to ‘these’ districts of Marathwada)…

राज्यातील ‘या’ भागात गारपिटीची शक्यता

राज्यात 8 मार्च व 9 मार्च दरम्यान गारपीटसह अवकाळी पाऊसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात काल (8 मार्च) बर्‍याच ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. आज 9 मार्च रोजी उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली असून काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. या मध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.

शेतकर्‍यांनी ‘ही’ काळजी घ्यावी

शेतामध्ये आपला शेतमाल उघडा पडलेला असेल तर ताबडतोब झाकून टाकावा. गारपिटीचा सतर्कतेचा इशारा असलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी घराबाहेर पडणं टाळावं.. आपल्या जनावरांची पूर्व काळजी घ्यावी…

‘या’ तारखेनंतर पावसाचा जोर कमी होणार असल्याचा मुंबई वेध शाळेचा अंदाज

देशातील व राज्यातील बर्‍याच भागात पावसाचा जोर दिसत आहे. पावसाचा हा जोर 10 मार्च नंतर कमी होईल असा अंदाज मुंबई वेध शाळेने दिला आहे…

Leave a Comment