कापसाचे हे टॉप १० बियाणे (वाण) तुम्हाला बनवतील लखपती..!

शेअर करा

टॉप कापूस बियाणे वाण | कापसाचे चांगले बियाणे | Top 10 Cotton seeds in Maharashtra |

कापसाचे बंपर उत्पादन घ्यायचे असेल तर कापसाची सर्वोत्तम व्हेरायटी निवड करणे खूप महत्वाचे आहे. शेतकरी दर वर्षी टॉप कापूस व्हेरायटी शोधत असतो. आज रोजी शेकडो व्हेरायटी बाजारात उपलब्ध आहे. पण शेतकरी सर्वच वान लावू शकता नाही, त्या पैकी कोणची बेस्ट कापूस व्हेरायटी आहे हे जाणून घेणे खूप महत्वाचे असते.

कधी कधी एखादी नवीन व्हेरायटी बाजारात येते आणि तिची शहा निशा न करता आपण ती पेरतो पण ती बोगस निघते आणि आपला वेळ आणि पैसा वाया जातो. त्यामुळे या लेखात आपण फक्त कुणाकडून ऐकून वाणाची निवड न करता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अनुभवातून जे कापसाचे वान खरच चांगले आहे ते जाणून घेणार आहोत.

येत्या १ जून पासून बाजारात कापसाचे बियाणे विक्री साठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कापसाचे वाण निवड करण्या आधी शेतकऱ्यांनी काही गोष्टी बघणे महत्वाचे आहे. आपल्या जमिनीचा प्रकार कोणता आहे? जमीन हलकी आहे की भारी? आपल्या कडे पाण्याची व्यवस्था आहे का? हवामान कसे आहे? लागवड दाट करायची की मोकळी? इ. गोष्टींचा विचार करूनच कापूस व्हेरायटीची निवड करावी.

आपण कापसाच्या वानाबद्दल जाणून घेताना त्याचा कालावधी किती आहे? झाडाची वैशिष्ट्ये काय आहे? एका बोंडाचे वजन किती भरते? जमिनीचा प्रकार, सिंचन व्यवस्था, लागवडीचे अंतर इ. गोष्टी जाणून घेणार आहोत…

येथे वाचा – शेतकरी बांधवांनो सावधान ! बियाणे खरेदी करताना ‘ही’ चूक केल्यास कृषी विभागही तुमची मदत करू शकत नाही..!

या आहेत टॉप कापूस बियाणे (व्हेरायटी) | Best/Top cotton variety in Maharashtra


(1) राशी 659

कालावधी        : १६०-१७० दिवस
जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी
सिंचन              : बागायत
उत्पादन           : १०- १६ क्विंटल/ एकर
लागवड अंतर    : ४×२, ५×१
बोंडाचे वजन     : ६-७gm
इतर वैशिष्ट्ये    : उशिरा येणारी व्हेरायटी,
                        रसशोषक किडींना सहनशील,
                        मोठे बोंड, जास्त उत्पादन
                        शेतकऱ्यांची सर्वात जास्त
                         पसंतीची.

(2) US Agriseeds US 7067

कालावधी        : १५५-१६० दिवस
जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी
सिंचन              : बागायत, कोरडवाहू
उत्पादन           : ८- १६ क्विंटल/ एकर
लागवड अंतर    : ४×१, ५×१
बोंडाचे वजन     : ६-६.५ gm
इतर वैशिष्ट्ये    : लवकर येणारी, दाट लागवडी
                        साठी सर्वोत्तम,
                        रसशोषक किडींना सहनशील,
                        मोठे बोंड, जास्त उत्पादन.

(3) राशी मॅजिक

कालावधी        : १५०-१६० दिवस
जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी
सिंचन              : बागायत
उत्पादन           : ८- १६ क्विंटल/ एकर
लागवड अंतर    : ४×१, ५×१
बोंडाचे वजन     : ६-६.५ gm
इतर वैशिष्ट्ये    : रसशोषक किडींना सहनशील,
                        मोठे बोंड, जास्त उत्पादन.

(4) Supercott (प्रभात)

कालावधी        : १६०-१७० दिवस
जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी
सिंचन              : बागायत, कोरडवाहू
उत्पादन           : ८- १६ क्विंटल/ एकर
लागवड अंतर    : ४×२, ५×१
बोंडाचे वजन     : ६.५-६ gm
इतर वैशिष्ट्ये    : रसशोषक किडींना सहनशील,
                        मोठे बोंड, जास्त उत्पादन,
                        शेंड्यावर जास्त बोंड.

(5) मोक्ष

कालावधी        : १५५-१६० दिवस
जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी
सिंचन              : बागायत, कोरडवाहू
उत्पादन           : ८- १६ क्विंटल/ एकर
लागवड अंतर    : ४×२, ५×१
बोंडाचे वजन     : ६-६.५ gm
इतर वैशिष्ट्ये    : रसशोषक किडींना सहनशील,
                        मोठे बोंड, बोंडाचे जास्त वजन,
                       वेचायला सोपी.

(6) मनी मेकर(कावेरी)

कालावधी        : १५५-१६० दिवस
जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी
सिंचन              : बागायत, कोरडवाहू
उत्पादन           : ८- १६ क्विंटल/ एकर
लागवड अंतर    : ४×२, ५×१
बोंडाचे वजन     : ६-६.५ gm
इतर वैशिष्ट्ये    : रसशोषक किडींना सहनशील,
                        मोठे बोंड, जास्त उत्पादन.

(7) धनदेव( मायको )

कालावधी        : १६०-१७०
जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी
सिंचन              : बागायत, कोरडवाहू
उत्पादन            : ८-१४ क्विंटल/एकर
लागवड अंतर    : ४×२, ५×२
बोंडाचे वजन     : ६ gm
इतर वैशिष्ट्ये    : जास्त फांद्या, डेरेदार झाड, मोठे
                        बोंड, लांब रेषा.

(8) अजित १९९

कालावधी        : १४५-१६० दिवस
जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी
सिंचन              : बागायत
उत्पादन            : ८-१६ क्विंटल/एकर
लागवड अंतर    : ४×१.५, ५×१.५
बोंडाचे वजन     : ६-६.५ gm
इतर वैशिष्ट्ये    : रोग, रस शोषक किडींना
                        सहनशील, पाने लाल होत नाही,
                        वेचायला चिकट.

(9) Volvo plus( Alp giri)

कालावधी        : १५०-१६० दिवस
जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी
सिंचन              : कोरडवाहू, बागायत
उत्पादन            : ८-१४ क्विंटल/एकर
लागवड अंतर    : ४×१.५, ५×२
बोंडाचे वजन     : ६.५-७ gm
इतर वैशिष्ट्ये    : हे वाण किडींना मध्यम
                        मध्यम स्वरूपाचे सहनशील, हे
                        वाण फरदड घेण्यासाठी उत्तम
                        आहे.

(10) पंगा( तुलसी सीड्स )
कालावधी        : १५५-१६० दिवस
जमिनीचा प्रकार: मध्यम, भारी
सिंचन              : कोरडवाहू, बागायत
उत्पादन            : ८-१४ क्विंटल/एकर
लागवड अंतर    : ४×२, ५×२
बोंडाचे वजन     : ६ gm
इतर वैशिष्ट्ये    : हे वाण दाट लागवडीसाठी
                        उत्तम आहे, बोंडांचा आकार
                        मोठा, वेचणीला सोपा, भरगोस
                        उत्पादन

शेतकरी बांधवांनो वरील टॉप १० वानांपैकी आपण आपल्या जमिनीला योग्य ती व आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सिंचन सोयी नुसार वाणाची निवड करावी. तसे सर्वच कापसाचे वाण चांगले आहे. कापसाची चांगली काळजी घेऊन योग्य त्या खतांचा वापर करून नक्कीच शेतकरी राजा विक्रमी कापसाचे उत्पादन मिळवू शकतो.

शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

2 thoughts on “कापसाचे हे टॉप १० बियाणे (वाण) तुम्हाला बनवतील लखपती..!

  • May 31, 2022 at 10:03 pm
    Permalink

    मी मागील दहा दिवसापासून विचार करत होतो की माझ्या जमिनीसाठी चांगले वाण कोणचे असेल ते, आणि मला या वर्षी दाट लागवड करायची असल्यामुळे मी त्या साठी चांगली व्हेरायटी शोधत होतो.
    सर तुमच्या पोस्ट मुले मला खूप फायदा झाला. धन्यवाद

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published.