भारता बद्दलचे टॉप 20 रोचक तथ्य, तुम्हाला माहिती आहे का?


भारता बद्दलचे टॉप 20 रोचक तथ्य. (Top 20 Interesting facts about India in Marathi)

आपला देश भारत एक असा देश आहे जिथे विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. इथे रोज काहीतरी नवीन घडत असते. आपला भारत रोचक घटना आणि अद्भुत गोष्टींच्या बाबतीत मागे राहिलेला नाही. (Top 20 Interesting facts about India in Marathi)

Top 20 Amazing facts about India in Marathi

भारतात अशा गोष्टी घडतात की ज्या जगासाठी नवीन असतात. म्हणजे जगात त्याची नोंद घेतली जाते. तर मित्रांनो आपल्या देशा बद्दलचे काही रोचक तथ्य आपन जाणून घेऊया. Top 20 Interesting facts about India in Marathi

जगातले सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम | World largest Cricket stadium in Marathi

नरेंद्र मोदी स्टेडियम | Narendra Modi Stadium in Marathi

World largest Cricket stadium in Marathi

कदाचित हे आपल्याला माहिती नसेल की जगातले सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम भारतात आहे. गुजरात मध्ये असलेले नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. अगोदर हे स्टेडियम मोटेरा स्टेडियम म्हणून ओळखले जायचे. पण 24 फेब्रुवारी 2021 रोजी या स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवण्यात आले. हे स्टेडियम गुजरातच्या अहमदाबाद मधील मोटेरा येथे आहे. ज्यामध्ये मध्ये 132,000 प्रेक्षक बसू शकतात एवढी क्षमता या स्टेडियमची आहे. स्टेडियमची मालकी गुजरात क्रिकेट संघाकडे आहे. 63 एकर जमिनीवर नरेंद्र मोदी स्टेडियम पसरलेले आहे. जवळपास 800 कोटी रुपये खर्च या स्टेडियमला आलेला आहे. यापूर्वी सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असण्याचा मान ऑस्ट्रेलियाकडे होता. Largest/biggest cricket stadium in India in Marathi

हे पण वाचा

खतरनाक आणि रहस्यमय अमेझॉन जंगल

आशियातील सर्वात मोठे रेल्वे जाळे | largest railway network in Asia in Marathi

देशाची प्रगती देशातील दळणवळणावर अवलंबून असते. त्यामध्ये रेल्वेचा महत्वाचा वाटा असतो.
भारतीय रेल्वेचे जाळे आशिया मध्ये सर्वात मोठे आहे. संपुर्ण जगात रेल्वे जाळ्यांच्या बाबतीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. अमेरिका पहिल्या नंबर वर येते. भारतीय रेल्वे मध्ये 16 लाख लोकांना रोजगार मिळालेला आहे. हा आकडा एखाद्या छोट्या देशाच्या लोकसंख्ये एवढा आहे.

largest railway network in Asia in Marathi

जगातील सर्वात मोठी शाळा भारतात | largest school in the world in Marathi)

लहानपणी सर्वांनाच आपली शाळा मोठी असल्याचा भास होत असतो. आपल्या शाळे सारखी शाळा कुठेच नाही असं प्रतेकाला वाटते कारण बाहेरच्या जागाची माहिती आपल्याला त्यावेळेस राहत नाही. जगातील सर्वात मोठी शाळा आपल्या भारतातच आहे, हे आतापर्यंत किती जणांना माहिती होतं? खाली कमेंट मध्ये सांगा.
हो खरचं, उत्तरप्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ मध्ये ‘सिटी मॉन्टेसरी स्कूल’ नावाची शाळा जगात सर्वात मोठी शाळा आहे. या शाळेत एकाच वेळी 56,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. गिनिज बुक ऑफ रिकॉर्ड मध्ये या शाळेची नोंद आहे. (City Montessori School in Marathi)

largest school in the world in Marathi

पाण्यावर तरंगणारे पोस्ट ऑफिस | Floating post office in Marathi

पाण्यावर तरंगणारे पोस्ट ऑफिस हे वाक्य ऐकून तुम्ही आश्चर्यचकित झाला असेल. हे ऐकून मला सुद्धा आश्चर्य वाटले होते. कारण त्यामध्ये काही रहस्य असणार असे मला वाटत होते. पण असं काहीच नाही. हे पोस्ट ऑफिस मानव निर्मित आहे. हाउस बोटीवर हे पोस्ट ऑफिस उभारण्यात आले आहे.

जम्मू काश्मीरचे तात्कालीन मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या हस्ते या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन ऑगस्ट 2011 मध्ये झाले होते. जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये असलेल्या दल सरोवरावर हे जगातले पहिले तरंगणारे पोस्ट ऑफिस आहे. पोस्ट ऑफिस बघण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येथे येत असतात. पर्यटकांना हे पोस्ट ऑफिस नेहमीच आकर्षक वाटत असते. (Floating post office in Marathi)

भारतात 1 लाख 55 हजार पोस्ट ऑफिस आहेत. म्हणजेच जगात सर्वात जास्त पोस्ट ऑफिस भारतातचं आहे.

शुन्याचा शोध | 0 Cha Shodh

शुन्याचा शोध भारतात पाचव्या शतकात गणित तज्ञ आर्यभट्ट यांनी लावला. भारताने जगाला दिलेली ही खुप मोठी देणगी आहे. आर्यभट्टांनी शुन्याचा शोध लावून गणित विषयात मोठे योगदान दिले आहे. असं म्हणतात की पाचव्या शतकाच्या अगोदर देखील शुन्याची संकल्पना होती पण त्यासाठी एक आकार लोकांकडे नव्हता.

शुन्याचा शोध 0 Cha Shodh

शुन्याचे महत्व गणिताच्या विश्वात खुप मोठे आहे. शुन्याशिवाय आकडेमोडी करणे फारच अवघड आहे. त्यामूळे हा शोध खुपच महत्वाचा मानला जातो. कारण हा शोध जर लागला नसता तर आता पर्यंत लागलेले मोठ मोठे शोध घेण्यास अडथळे आले असते.

सर्वात जास्त इंग्रजी बोलणारा भारत नंबर दोनचा देश | Amazing Facts in Marathi

सर्वात जात इंग्रजी फक्त विदेशातचं बोलली जाते. असा आपल्याकडील काही लोकांचा गैरसमज असतो. पण जरा थोडं थांबा कारण भारत सर्वात जास्त इंग्रजी बोलणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

Second most English-speaking country

भारतातील एकून संख्येच्या 20% टक्के लोक इंग्रजी बोलतात. हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसला असेल. जगात सर्वात जास्त इंग्रजी अमेरीकेत बोलली जाते. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो.

चंद्रावर पाण्याचा शोध भारताने लावला. (Interesting facts about India in Marathi

अवकाश संशोधन करण्यात भारताचे मोलाचे योगदान आहे. चंद्रावर पाण्याचं अस्तित्व असल्याचं सर्व प्रथम भारताने शोधून काढलं. भारतीय संशोधन संस्थने ( ISRO) 2009 मध्ये हा शोध लावला.

India discovered water on the moon

जगातील सर्वात मोठी लोकशाही. (Largest democracy in Marathi

आपल्याला माहित आहे का? जगात आपल्या भारत देशाची लोकशाही सर्वात मजबूत आणि मोठी मानली जाते. कारण इथे राज्यकर्ते लोकांमधून निवडले जातात. काही देशांमध्ये अजून सुद्धा घराणे शाही आणि राजेशाही देशाचा कारभार पाहत आहे. यामूळे नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली होण्याची शक्यता असते.

भारताच्या सविधांन निर्मात्यांनी कोणत्याही नागरीकाचे अधिकार हिसकावून घेतले जाणार नाही याची व्यवस्था करून ठेवली आहे. म्हणून तर आपल्या देशाकडे शांततेचा देश म्हणून पाहिलं जातं. भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमी शांततेचा संदेश दिला आहे.

जगातील सर्वात छोटी गाय भारतात. (World smallest cow in Marathi)

जगातील सर्वात छोटी गाय भारतातील केरळ राज्यात आहे. या गाईचे नाव मनिक्यम (Manikyam) आहे.
अक्षय एन.व्ही नावाचा व्यक्ती या गाईचे पालन करतो. गिनिज बुक ऑफ रिकॉर्डच्या वेबसाइट नुसार या गाइची उंची 24.07 इतकी आहे.

World smallest cow in Marathi

भारतातील कुंभमेळा दिसला अंतरिक्ष मधून. (Top 20 Amazing facts about India in Marathi)

2011 मध्ये हरिद्वार येथे भरलेल्या कुंभमेळ्यात सर्वात जास्त लोक एकत्र आले होते. या कुंभमेळ्यात 7.5 कोटी साधू, संत आणि भाविक जमले होते. ऐवढ्या मोठ्या संख्येत जमलेल्या भाविकांची गर्दी अंतरिक्ष मधून बघायला मिळाली होती.

Amazing facts about India in Marathi

जगातील सर्वात लांब मिशीवाला माणुस भारतात. (Top 20 Interesting facts about India in Marathi)

जगात सर्वाधिक लांब मिशा असणारा व्यक्ती भारतात आहे. या व्यक्तीचे नाव राम सिंह चौहाण आहे. चौहाण यांच्या मिशा 4.29 लांबीच्या आहे. गिनिज बुक ऑफ रिकॉर्ड मध्ये यांच्या मिशांची नोंद झालेली आहे.

Top 20 Interesting facts about India

भारतात लागला बुद्धिबळ खेळाचा शोध. (Chess game in Marathi)

Chess game in Marathi

बुद्धिबळ खेळ (Chess game) हा बुद्धिला खुप कसरत देणारा खेळ समजला जातो. हा खेळ खेळणे सर्वांना शक्य नसते कारण या खेळात मनाला खुप एकाग्र ठेवावे लागते. अवघड समजल्या जाणाऱ्या या बुद्धिबळ खेळाचा शोध भारतात लागला. आज हा खेळ संपुर्ण जगात खेळला जातो.

भारतात आहे एकही दरवाजा नसलेले गाव. (A village without a door in Marathi)

A village without a door in Marathi

भारतात एक असे गाव आहे जिथे एकाही घराला दरवाजा नाही. मित्रांनो, त्या गावा बद्दल आपल्याला माहिती असेल. ते गाव आहे आपल्या महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर. या गावामध्ये जर कोणी चोरी केली तर त्याला शनी देव शिक्षा करतात असं गावातील नागरिकांचं म्हणणं आहे. म्हणून या गावात चोरी होत नाही.

1 मिनीटात 122 नारळ फोडण्याचा विक्रम भारतात. (Top 20 Interesting facts about India in Marathi)

Image Credit : Youtube.com

भारतातील केरळ राज्याच्या कोट्टायम जिल्ह्यातील अभेश (Abheesh) नावाच्या व्यक्तीने एका मिनीटात 122 नारळ फोडले आहे. गिनिज बुक ऑफ रिकॉर्ड मध्ये विक्रम नोंदवला आहे.

भारतात आहे जगातील सर्वात लहान महिला. (Smallest women in the world in Marathi )

जगातील सर्वात लहान महिला भारतात असून याची गिनिज बुक ऑफ रिकॉर्ड मध्ये नोंद आहे. या महिलेची उंची 63 सें.मी आहे. नागपूर येथे 16 डिसेंबर 1993 मध्ये या महिलेचा जन्म झाला. ज्योती किसंगे आमगे असं या महिलेचं नाव आहे.

Image Credit : Jyoti Amge

भारतात लागला साप सीडी खेळाचा शोध. (Top 20 Amazing facts about India in Marathi)

Image Credit : Facebook.com

लहानपणी आपन साप सीडीचा खेळ नक्कीच खेळला असेल. या खेळा बद्दल ऐकताच लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. या खेळाची सुरुवात सर्व प्रथम भारतातचं झाली आहे.

भारताची ‘ह्यूमन कंप्यूटर’ महिला. (Human Computer lady in Marathi )

Image Credit : Shakuntala Devi


13 अंकी गुणाकाराचे उत्तर 28 सेकंदात देणाऱ्या महिलेचा जन्म 4 नोव्हेंबर 1929 साली झाला होता. शकुंतला देवी असं महिलेचे नाव होते. या महिलेला ‘ह्यूमन कंप्यूटर’ देखील म्हटलं जातं. त्यांचा मृत्यू 21 एप्रिल 2013 रोजी बेंगलोर येथील हॉस्पिटल मध्ये झाला.

भारतात आहे जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे गाव. (rainiest village in Marathi)

rainiest village interesting facts about India in Marathi

मित्रांनो, आपल्या देशात एक असे गाव आहे जिथे जगातील सर्वात जास्त पाऊस पडतो. मेघालय राज्यातील पुर्व खासी हिल्स जिल्ह्यात असलेले माॅसिनराम या गावात जगातील सर्वाधिक पाऊस पडतो. हे गाव शिलाॅगपासून 65 किलोमीटर अंतरावर आहे. इथे दर वर्षाला सरासरी 11872 मिलीमीटर पाऊस होत असतो. याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये झालेली आहे.

भारत जगातील सर्वात मोठा शाकाहारी लोकांचा देश. (Top 20 Interesting facts about India in Marathi) )

largest vegetarian country Interesting facts about India in Marathi

वर्ल्ड ऍटलास डॉट कॉम नुसार जगातील सर्वाधिक शाकाहारी लोक भारतात आहे. भारताच्या एकून लोक संख्येच्या 38 % लोक शाकाहारी आहे. (largest vegetarian country in the world in Marathi)

भारतात लागला शाम्पूचा शोध. (invention of shampoo)

अंघोळ करत असताना शाम्पूचा शोध कोणी लावला? असा प्रश्न कधी आपल्याला पडलाय का? नसेल पडला तर हे माहिती करून घ्या.
शाम्पूचा शोध आपल्या भारतात लागला आहे. संस्कृत मध्ये असलेल्या ‘चम्पू’ या शब्दा पासून ‘शाम्पू’ शब्द आलेला आहे.

हे रोचक तथ्य पण वाचा

5 thoughts on “भारता बद्दलचे टॉप 20 रोचक तथ्य, तुम्हाला माहिती आहे का?

 • September 23, 2021 at 3:08 am
  Permalink

  छान माहिती

  Reply
 • September 23, 2021 at 6:35 am
  Permalink

  Best information sir

  Reply
 • September 23, 2021 at 11:51 am
  Permalink

  Good Information

  Reply
 • September 23, 2021 at 11:52 am
  Permalink

  Thanks once again for providing valuable info

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published.