चिंता नको! होम लोनचा हप्ता भरता येत नसेल तर हा पर्याय येईल तुमच्या कामी, पहा फायद्याची बातमी..!

Home Loan EMI : घर बांधण्यासाठी किंवा नवीन घर विकत घेण्यासाठी अनेक जण बँकेकडून लोन उचलतात. अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते की सर्वकाही व्यवस्थित सुरु असताना काही तरी आकस्मिक खर्च येतो. आणि त्याठिकाणी सर्व पैसा खर्च होतो. त्यामुळे वेळेवर हप्ता न भरल्याने कर्जदार डिफॉल्टर ठरतो. लोन भरण्याची इच्छा असताना काही कारणाने लोनचे हप्ते थकले तर घाबरू नका, आरबीआयचा हा नियम तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतो.

Home Loan EMI

घर असो की प्लॉट, हे खरेदी करण्यासाठी कोणाकडेच मोठी रक्कम राहत नाही. त्यामुळे अनेकांना हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बँकेकडून होम लोन घ्यावे लागते, हे लोन EMI च्या माध्यमातून म्हणजेच हप्त्यानुसार भरता येत असल्याने सामान्य माणसांना घर बांधणे किंवा विकत घेणे सोपे झाले आहे. तसेच बर्‍याचदा लोक अचानकपणे आलेल्या इतर कामासाठी वैयक्तिक लोन (Personal Loan) घेतात.

येथे वाचा – स्वस्तात घर पाहिजे? म्हाडाच्या या घरांसाठी लवकरच जाहिरात; येथे क्लिक करून पहा बातमी..

पण काही महिने उलटून गेल्या नंतर काही लोकांना लोनचे ईएमआय म्हणजेच हप्ता भरणे जड होऊन जाते. लोनचे हप्त्ये भरण्याची इच्छा असताना देखील अनेकांना लोनचा हप्ता वेळेवर भरता येत नाही. त्यामुळे बँक त्यांना नोटीस पाठवते. अनेक वेळा नोटीस पाठवून देखील लोन भरले नाही तर अशा कर्जदाराला बँक डिफॉल्टर म्हणून घोषीत करतात. बँकेकडून कर्ज बुडव्याचा एकदा शिक्का लागल्यानंतर त्या व्यक्तीला कर्ज मिळत नाही. पण अशा लोकांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एक खास नियम बनवला आहे. चला जाणून घेऊया काय आहे हा नियम?

येथे वाचा – मुंबईकरांनो! म्हाडा काढणार 5 हजार 311 घरांची लॉटरी, पहा सविस्तर..!

काय आहे हा RBI चा नियम? (RBI Rules for Loan holder)

रिझर्व्ह बँकेच्या (RBI) या नवीन नियमानुसार, लोन धारकाला काही आर्थिक अडचण असल्यास आणि तो वेळेवर लोनचा हप्ता भरण्यासाठी सक्षम नसेल तर त्याच्याकडे रीस्ट्रक्चरचा पर्याय असतो. या पर्यायाचा वापर करून लोन धारकाला त्याचा लोनचा कालावधी वाढवता येईल. त्यामुळे त्याच्या हप्त्याची जी रक्कम आहे ती कमी होईल. बँकेकडून ग्राहकाच्या सुविधेनुसार ही रक्कम निश्चित करण्यात येते. त्यामूळे लोन धारकाला पुढील हप्ते भरणे सोपे होते. आणि त्याच्यावरील आलेला लोनचा दबाव कमी होतो.

येथे वाचा – घर घेताना फसवणूक झाली तर हा पर्याय येईल कामी, पहा कामाची माहिती..!

Leave a Comment