शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली साखर कारखाने करणार आॅक्सिजन निर्मीती, या योजनेवर निलेश राणेंची जोरदार टीका..!

मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती खुप चिंताजनक झाली आहे. सध्या सर्वत्र आॅक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णालयामध्ये आॅक्सिजन पुरेसा नसल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अशा परिस्थितीत आॅक्सिजन निर्मीतीवर जास्त भर दिला जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील 190 साखर कारखान्यांना आॅक्सिजन निर्मीती करण्या संदर्भात पत्र पाठवले आहे.शरद पवारांच्या सुचनेनुसार वसंतदादा शुगर इन्स्टिटूटच्या वतीने हे पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रा मध्ये साखर कारखान्यांना आॅक्सिजन निर्मीती करण्याचे आवाहन केले आहे. तसेच बंद पदलेल्या कारखान्यांना आॅक्सिजन किट खरेदी करून पुरवण्याच्याही सुचना दिल्या आहे.

आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेली परिस्तिती लक्षात घेता देशातील मोठे उद्योग आॅक्सिजन निर्मीतकडे वळले आहे. टाटा समुह आणि रिलायन्स समुह या दोन देशातल्या मोठ्या कंपन्यांनी आपापल्या ऑईल रिफायनरीमध्ये बदल करून देशभरात ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्रामध्येही आॅक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आॅक्सिजनची निर्मीती केली जाणार आहे.

वेदांता समुहाने देखील केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे आॅक्सिजन निर्मीती करणारा प्रकल्प सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. यामुळे देशाला 1000 टन आॅक्सिजन मिळणार आहे आणि देशातील आॅक्सिजन तुटवड्यावर पुर्णपणे मात केली जाणार आहे.

शरद पवारांंच्या आॅक्सिजन निर्मीती योजनेवर निलेश राणेंचा निशाणा
आॅक्सिजन तुटवडा भरुन काढण्यासाठी शरद पवारांनी राज्यातील 190 कारखान्यांना आॅक्सिजन निर्मीती करण्या संदर्भात पत्र लिहिलं आहे. त्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवारांवर निशाना साधला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटर वरुन ट्वीट केले आहे. ‘साहेब आपण काही करू नका महाराष्ट्राचे डॉक्टर्स व या क्षेत्रातील इंडस्ट्रीज ह्या विषयाचा मार्ग काढतील. तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही. अगोदरच सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखरकारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील’. असं म्हणत निलेश राणेंनी शरद पवारांवर निशाना साधला आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment