मुंबईत म्हाडाची लॉटरी कधी निघेल? पहा पुढील लॉटरी विषयी महत्वाची बातमी;

म्हाडा लॉटरी संदर्भात (Mhada mumbai lottery) नेहमी येणारे नवनवीन अपडेट आपन पाहत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची (2 bhk flat in mumbai) लॉटरी काढली गेली होती. सध्या या लॉटरीमधील विजेत्यांची घरे (Mhada Flats) ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या लॉटरीमध्ये ज्या लोकांना घरे मिळाली नाहीत त्यांच्याकडून मुंबईची लॉटरी कधी येणार आहे? असे प्रश्न विचारले जात होते.

सध्या मागील महिन्यामध्ये झालेली मुंबई लॉटरीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. अनेक विजेत्यांना महामंडळाच्या माध्यमातून एस्टिमेशन लेटर आले आहेत. त्याच नागरिकांची सध्या लोन प्रक्रिया सुरू आहे. सादर लॉटरी मध्ये जे वेटिंग लिस्ट वर होते त्यांची प्रक्रिया म्हाडाच्या माध्यमातून ऍक्टिव्हेट केली आहे. वेटिंग लिस्ट वर असलेल्या उमेदवारांना म्हाडाच्या माध्यमातून रजिस्टर मोबाईल क्रमांक वर मेसेज पाठवले आहेत. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून लॉगिन करून एस्टिमेशन लेटर पात्र उमेदवार अगदी सहज डाऊनलोड करू शकतील.

काय सांगता ! पुण्यात म्हाडाची स्वस्त घरे उपलब्ध होणार? पुन्हा स्वस्तात घर घेण्याची संधी, पहा संपूर्ण बातमी..!

यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की, पुढील मुंबई मंडळाची लॉटरी नक्की कधी येईल? कारण की मागील लॉटरी प्रक्रियेमध्ये ज्या नागरिकांना अद्याप घर लागले नाही (mhada lottery mumbai) अशा अर्जदारांचे संपूर्ण लक्ष पुढील मुंबईची लॉटरी कधी लागेल याकडेच आहे.

बाप रे! ठाण्यातील म्हाडाची घरे झाली महाग..पहा किती लाखांनी वाढवली किंमत..!

मुंबईच्या पुढील येणाऱ्या लॉटरी संदर्भाबद्दल माडाच्या माध्यमातून अद्याप कोणतेही अपडेट आले नाही. म्हाडाच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे त्यामध्ये असे सांगितले जात आहे की, पुढील म्हाडाची लॉटरी 2025 मध्ये येईल अशी शक्यता आहे. अपकमिंग लॉटरी मध्ये विक्रोळी परिसरामध्ये टू बीएचके घरे असतील. सध्या म्हाडाचे बांधकाम कांदिवली परिसरामध्ये सुद्धा सुरू आहे. येथील घराचा सुद्धा पुढील येणाऱ्या लॉटरी प्रक्रियेमध्ये समावेश होऊ शकतो (Mhada Mumbai 2 BHK Flat). तिसरे ठिकाण सायन या ठिकाणी असणार आहे. यानंतर पुढे महत्त्वाचे लोकेशन म्हणजेच गोरेगाव. या ठिकाणी सुद्धा टू बीएचके तसेच थ्री बीएचके घरांचा अगदी मोठ्या प्रमाणामध्ये समावेश होईल. असे सांगितले जात आहे.

दिवाळीत नवीन घर खरेदीसाठी मुंबईतील या भागाला लोकांची सर्वाधिक पसंती..पहा स्वस्त घरं कुठे?

प्रेम नगर तसेच पहाडी गोरेगाव अशा ठिकाणी म्हाडाची एकूण प्रस्तावित अशी 7500 घरे आहेत. त्यामधील एकूण 4000 घरांचे सध्या बांधकाम चालू आहे. ह्याच 4000 घरांपैकी तब्बल 2683 घरांची लॉटरी ही मागील महिन्यातच जाहीर झाली. यामध्ये बाकी असलेले 1337 घरे पुढील लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट होतील. विशेष भाग म्हणजे म्हाडाच्या या टॉवरमध्ये विविध सुविधा देण्यात येणार आहेत. त्यामध्ये जिम, स्पेसिअस पार्किंग, स्विमिंग पूल अशा घटकांचा समावेश आहे.

मुंबईतील घरे स्वस्त होणार? घर घ्यायचे असेल तर पहा बातमी..!वाचा महत्वाची बातमी..

यानंतर पुढे गोरेगाव पहाडी या ठिकाणी असलेल्या लिंक रोडवर प्रस्तावित अशी म्हाडाची 800 घरे आहेत. लवकरच या ठिकाणी सुद्धा घरांचे बांधकाम सुरू होईल आणि या घरांचा सुद्धा म्हाडाच्या पुढील येणाऱ्या लॉटरीमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

Leave a Comment