(1) CSC केंद्र

ग्रामीण भागातील लोकांना ऑनलाइन कामांमध्ये नेहमी अडचन येत असते. अशिक्षीत असल्यामूळे त्यांना ऑनलाइनचे काम जमत नाही. त्यासाठी तुम्ही त्यांना ही सेवा पुरवून चांगली इनकम कमावू शकता..

(2) दुध डेरी -

दुध डेरी चालू करण्यासाठी तुमच्याकडे गाय व म्हैस असणं गरजेचं नाही.. लोकांकडून दुध घेऊन तुम्ही विकू शकता... याला जास्त गुंतवणुक लागत नाही

(3) दुध व्यवसाय

हा व्यवसाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गाय आणि म्हैस विकत घ्यावे लागतील. दुधाची मागणी सगळीकडे वाढल्यामूळे या व्यवसायात सध्या खुप स्कोप आहे

(4) फुल व्यवसाय -

एक ते दोन गुंठे जमिनीवर करता येईल असा व्यवसाय म्हणजे फुल व्यवसाय.. ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या व्यवसायिकांना दुकानात लावण्यासाठी फुलांची खुप गरज असते. त्यासाठी तुम्ही स्वतःचं फुल भंडार उभारू शकता.

(5) मोबाइल रेपैरींग -

ग्रामीण भागात मोबाइल दुरुस्ती करणारे हवे तसे कारागीर नाही. तुम्ही हे कौशल्य आपल्यामध्ये विकसीत करून ग्रामीण भागात एक उत्तम कारागीर म्हणून उदयास येऊ शकता...

(6) डी.जे -

आज काल ग्रामीण भागात लग्नांमध्ये डी.जे लावण्याची परंपरा झाली आहे. त्यासाठी हा व्यवसाय ग्रामीण भागात खुप चालणारा आहे...

(7) केकची दुकान

अलीकडच्या काळात केकशिवाय वाढदिवस साजरे होतंच नाही. गावातील पुढारी तरूणांचे वाढदिवस साजरे करून त्यांना आपल्याकडे खेचत असतात. त्यामूळे केकचा व्यवसाय खुप चालणारा आहे..