ग्रामीण भागातून करण्याजोगे सहा व्यवसाय

(1) खत आणि बियाणे स्टोअर (Fertilizer and Seed Store)

बऱ्याच गावांमध्ये खतं व बियाणे मिळत नाही. त्यांना जवळ असलेल्या शहरावर अवलंबून रहावं लागतं. अशा जवळील गावांचा शोध घेऊन सुरुवातीला कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय करता येतो. हळूहळू हा व्यवसाय वाढवून चांगले उत्पन्न कमावता येते.

(2) शहरात भाजीपाला विकण्याचा व्यवसाय

आपल्या गावात शेती करून त्यामध्ये घेतला जाणारा भाजीपाला थेट शहरात नेऊन घरोघरी विकून चांगला इनकम आपल्याला बनवता येतो. काही दिवसानंतर त्यातील बरेच लोक तुमचे कायमस्वरूपीचे ग्राहक बनतील. मग नंतर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही...

(3) सेंद्रिय शेती (Organic Farming)

आज सेंद्रिय शेतातील भाजीपाला व फळे याला खुपच मागणी आहे. चांगल्या आरोग्यासाठी लोक अशा शेतीतील भाजीपाला व फळे खाणे पसंद करतात. त्यामूळे याची वाढती मागणी लक्षात घेता तुम्ही आपल्या व्यवसायाला उभारी देऊ शकता.

(4) कुकुट पालन (Poultry farming)

कुकुट पालन करून लाखो रुपये कमावता येते हे अनेक जनांनी सिद्ध करून दाखवलं आहे. यामध्ये तुम्ही दोन प्रकारे कुकुट पालन करू शकता - (1) अंडी उत्पादन (2) मांस...

(5) दुध सेंटर

लोकांचा शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात वाढता कल यामूळे दूध देणारे पाळीव प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. यामूळे गावोगावी दुधाची टंचाई भासत आहे. लोकांची ही टंचाई दुर करून तुम्ही आपला इनकम स्रोत चालू करू शकता.

(6) CSC केंद्र

अलीकडे शेतकऱ्यांसाठी सरकार वेगवेगळ्या योजना नियमित आणत असते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया करावी लागते. ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात अशिक्षीत असल्यामूळे ते स्वतः करू शकत नाही. त्यामूळे ही संधी ओळखून CSC केंद्राचे रोजगार केंद्रात तुम्ही रूपांतर करू शकता.

कमी पैशात सुरु करता येणारे हे व्यवसाय तुम्हाला लखपती बनवतील

नवीन स्टोरी पाहण्यासाठी