WhatsApp मध्ये येत आहे ‘हे’ नवीन फीचर, सर्वांसाठी असणार फायद्याचे..!

दिल्ली : सर्वात लोकप्रिय असलेले आणि सर्वात वेगवान माहिती पोहोचवणारे Aap म्हणजे WhatsApp जगप्रसिद्ध आहे. जगामध्ये या App चा मैसेजिंग साठी सर्वात जास्त वापर केला जातो. आणि WhatsApp खुप कमी वेळात अनेक नवनवीन फीचर आणणारे App आहे. अशाच एका नवीन फीचर बद्दल आपन माहिती घेणार आहोत. या नवीन फीचर द्वारे चॅट करते वेळी युजरला जर व्हाॅईस मैसेज पाठवायचा असेल तर तो पाठवण्यापुर्वी त्याला तो ऐकता येणार आहे. यामुळे युजरला खात्री करुन मैसेज पाठवण्याची संधी या नवीन फीचर द्वारे मिळणार आहे.

कंपनीकडून हे नवीन फीचर एंड्रॉइड साठी बिटा वर्जन 2.21.12.7 सोबत देणार आहे, अशी माहिती WABETAINFO कडून मिळाली आहे. एका माहितीनुसार कंपनीचे हे काम iOS साठी आधीपासूनच चालू होते. अलीकडे हे नवीन फीचर एंड्रॉइड साठी देखील बनवले जात आहे. एकदा रिकॉर्ड केलेला व्हॉईस युजर पडताळून पाहू शकतील. हे नवीन फीचर अशिक्षीत युजर साठी खुप वरदान ठरणार आहे.

Cancel ऐवजी दिसणार Stop बटण
आता आपन वापरत असलेल्या व्हर्जन मध्ये वॉईस रिकॉर्ड करत असतांना Cancel ऑप्शन दाखवते ज्यामुळे वॉईस मैसेज डिलीट होतो. पण या नवीन फीचर मध्ये Cancel ऐवजी Stop बटण असणार आहे ज्यामुळे आपल्याला वॉईस पडताळून पाहता येणार आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे Facebook Page लाईक करा.

Leave a Comment