तूर 10 हजारांवर ; सोयाबीन बाजारभाव कधी वाढणार? जाणून घ्या | Soybean Rate

Soybean Rate : हल्ली शेतकरी खरीप हंगामातील शेती कामाकडे वळला आहे. अधिकाधिक उत्पादन कसे घेता येईल याचे नियोजन करणे सुरू आहे. मात्र, शेती करण्यासाठी हाताशी पैसे असणे गरजेचे आहे, यासाठी ज्या शेतकऱ्यांनी बियाण्याची तजवीज करण्यासाठी सोयाबीन राखून ठेवले होते.

ते सोयाबीन नाईलाजाने विक्रीसाठी बाजारात आणत असल्याचे चित्र दिसत आहे, पण जिल्ह्यातील काही बाजार समित्या पावसामुळे तसेच शेतकरी शेतमाल आणत नसल्याने बंद आहेत तर काही जागेअभावी, याचाही मनस्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

दोन वर्षांपूर्वी जून, जुलै महिन्यांत सोयाबीनचे दर १० हजार रुपये क्विंटलच्या घरात होते. यामुळे यावर्षी देखील सोयाबीनच्या दरात चांगली तेजी राहील, या विचाराने काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री थांबविली. तर सरकार तुरीवर दबाव आणत आहे.

यातून तुरीचे दर पड़तील, अशी शंका शेतकऱ्यांना होती. यातून शेतकऱ्यांनी तुरीची विक्री केली. आता बाज़ारात विरुद्ध चित्र निर्माण झाले आहे. तुरीचा दर १० हजारावर पोहोचला आहे. तर सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. पुढील काळात सोयाबीनचे दर वाढण्याचे कोणतेही संकेत नाहीत. त्यामुळे मिळेल त्या भावात शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी काढले आहे.

बियाण्यांचे सोयाबीन

बाजारात दर वाढीच्या आशेने व बियाण्यासाठी काही शेतकऱ्यांनी सोयाबीन राखून ठेवली होती. पण अधिक काळ सोयाबीन ठेवल्याने ही तूट येते. यामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी काढले आहे.

तुरीची आवक घटली

तुरीचे दर तेजीत आहे. पूर्वी क्विटलंचे दर सात ते साडेसात हजार रुपये होते. ते आता १० हजारांवर गेले आहे. पूर्वीच्या तुलनेत दरामध्ये अडीच ते तीन हजार रुपये क्विटलची दरवाढ झाली आहे. यानंतरही बाजारपेठेत तुरीची आवक घटली. आहे. या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना होणार आहे. तुरीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शेतकरी म्हणतात……

मागील वर्षीचे ४५ क्विटल सोयाबीन याच महिन्यात विकले मला ४५०० रुपये भाव मिळाला. सोयाबीनचे भाव वाढेल या आशेवर दहा महिने थांबलो.परंतु, आता नवीन हंगामासाठी पैशाची गरज होती. त्यामुळे मिळेल त्या भावात विकावे लागले. सरकार जोपर्यंत आयात निर्यातीच्या धोरणाबद्दल निर्णय घेत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा फायदा होणार नाही याचे कारण सरकारने आयात करून शेतीमालाचे भाव पडायचे आणि दुसरीकडे निर्यात थांबून सुद्धा शेतीमालाचे भाव पाडायचे हे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत शेतकयाच्या पदरात चार पैसे कधीही पडणार नाही. सतीश दाणी, शेतकरी, सोनेगाव (आबाजी).

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/08/2023
लासलगावक्विंटल126349950004900
लासलगाव – विंचूरक्विंटल98350049554800
शहादाक्विंटल4472648004726
माजलगावक्विंटल201460048114700
चंद्रपूरक्विंटल10474047854775
राहूरी -वांबोरीक्विंटल3370053604500
सिल्लोडक्विंटल20470048004800
कारंजाक्विंटल2500461049554800
तुळजापूरक्विंटल70450048004700
मानोराक्विंटल199436049804814
मोर्शीक्विंटल400460048654732
मालेगाव (वाशिम)क्विंटल86420049004500
राहताक्विंटल6475148004775
धुळेहायब्रीडक्विंटल66200021002068
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल103330349454920
सोलापूरलोकलक्विंटल47401048904675
अमरावतीलोकलक्विंटल3138475049204835
नागपूरलोकलक्विंटल150450050004875
हिंगोलीलोकलक्विंटल400465549284719
कोपरगावलोकलक्विंटल72440148904794
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल8455047514640
मेहकरलोकलक्विंटल620420049504700
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल104310149194900
लातूरपिवळाक्विंटल7672475049624870
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल108460049014800
जालनापिवळाक्विंटल1153400048504825
अकोलापिवळाक्विंटल558400048654620
यवतमाळपिवळाक्विंटल233469548504772
मालेगावपिवळाक्विंटल12450048014726
चिखलीपिवळाक्विंटल160440047504575
हिंगणघाटपिवळाक्विंटल2818320050004400
वाशीमपिवळाक्विंटल2400456049004650
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल300450050004800
उमरेडपिवळाक्विंटल865400048704750
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल79470047504725
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल900460549204805
वणीपिवळाक्विंटल224457047954700
सावनेरपिवळाक्विंटल8468546854685
गेवराईपिवळाक्विंटल21470047494724
गंगाखेडपिवळाक्विंटल10480049004800
मनवतपिवळाक्विंटल9475048004800
देउळगाव राजापिवळाक्विंटल15461148004700
नांदगावपिवळाक्विंटल3400048204701
चाकूरपिवळाक्विंटल15400148514551
औराद शहाजानीपिवळाक्विंटल146484148854863
मुरुमपिवळाक्विंटल26485148514851
पाथरीपिवळाक्विंटल13445147004600
नांदूरापिवळाक्विंटल185438148764876
नेर परसोपंतपिवळाक्विंटल345300049204632
राजूरापिवळाक्विंटल20461546404623
काटोलपिवळाक्विंटल25464048454750
वाचा : टोमॅटो नंतर आता कापूस दराची जोरदार मुसंडी, भाव दहा हजार पार जाणार? Cotton rate

Leave a Comment