#ResignModi : “मोदी राजीनामा द्या” हा हॅशटॅग फेसबुक ने का केला ब्लॉक? जाणून घ्या सत्य..!

मुंबई : “मोदी राजिनामा द्या”(#ResignModi) हा हॅशटॅग सध्या सोशल मीडिया वर वेगाने फिरतोय. हा हॅशटॅग ट्विटर वर आणि फेसबुकवर बऱ्याच दिवसांपासून फिरतोय. पण हा हॅशटॅग काही दिवसांपूर्वीच फेसबुक ने ब्लॉक केला होता. त्यामुळे लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. हा हॅशटॅग फेसबुक ने ब्लॉक का केला? याचे फेसबुक ने स्पष्टीकरण दिले आहे.

काही दिवसांपूर्वी तर हा हॅशटॅग ट्विटर वर ट्रेडिंग वर होता. उद्भवलेल्या कोरोना महामारीच्या संकटाशी दोन हात करण्यास राज्य सरकारे आणि केंद्र सरकार अपयशी ठरल्यामुळे जनतेने आपल्या मनातील सरकार बद्दलचा संताप या हॅशटॅगच्या माध्यमातून व्यक्त केला आणि तो आता सोशल मीडियावर ट्रेडिंग वर देखील आहे.

हा हॅशटॅग ब्लॉक केल्याच्या आरोपावर फेसबुक ने स्वतः उत्तर दिले आहे. फेसबुकने सांगितले की, आम्ही हा हॅशटॅग तात्पुरता चुकून बंद केला होता, भारत सरकारने आम्हाला तसे काही करण्यास सांगितले नव्हते. आता हा हॅशटॅग आम्ही पुनर्संचयित केला आहे. असं म्हणत फेसबुक ने आपले स्पष्टीकरण दिले आहे. यावर मोदी सरकारने देखील खुलासा केला आहे. सरकारने म्हटलं आहे की, सरकारकडून हा हॅशटॅग हटवण्याचे निर्देश देण्यात आले नव्हते. फेसबुक ने हा हॅशटॅग चुकिने हटवल्याचे सरकार कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

#ResignModi हा हॅशटॅग सोशल मीडिया वर कसा आला?
गेल्या काही दिवसांपासून राज्यात व देशात कोरोना महामारीमुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. रेमडिसिवीर औषध व आॅक्सिजनच्या तुटवड्यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यूचा तांडव सुरू आहे. देशातील या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार अतोनात प्रयत्न करत आहे. पण सरकारला यामध्ये अपयश येतांना दिसत आहे. यामुळे लोकांनी आणि विरोधकांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी #ResignModi हा हॅशटॅग सोशल मीडिया वर चालवला आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment