भारतात Google Map एवढा ब्लर (अस्पष्ट) का दाखवतात? हे आहे कारण..!

दिल्ली : जगातील अनेक देशांमध्ये गूगल मॅप स्पष्ट दिसतो मग भारतात एवढा ब्लर का दाखवला जातो. गूगल चे भारता सोबत काही वैर तर नाही ना? (Why Google Map so blurry in India?) असा प्रश्न बाहुतांश लोकांना पडला असेल. पण याचे खरे कारण बघून तुमच्या मनातील हा गैरसमज दूर होईल. गूगल ही अमेरिकेतील कंपनी आहे. भारताचे आणि अमेरीकेचे एक मेकांसोबत असलेले संबंध पुर्वी पासूनच अनूकूल आहे.

Google ने मॅप कसा दाखवावा? स्पष्ट की अस्पष्ट हे Google ठरवत नाही. हे तेथील सरकार वर अवलंबून असतं. जागातील बऱ्याच देशांमध्ये गूगल मॅप स्पष्टपणे दाखवला जातो. कंपनी तेथील सरकारच्या परवानगी मुळे दाखवते. पण काही देशांनी राष्ट्र सुरक्षा, महत्वांच्या व्यक्तींची सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मॅप अस्पष्ट दाखवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मॅप स्पष्ट दाखवल्यामूळे दहशतवादी हल्ले होण्याची भीती असते. मॅपचा गैरवापर करून काही दहशतवादी संघटना महत्वाच्या जागेचा किंवा महत्वाच्या व्यक्तींच्या जागेची खोलवर पाहणी करून हल्ल्याचा कट रचण्याचा धोका असतो. दिल्ली येथे संसदेवर झालेला हल्ला देखील याच साधनांचा गैरवापर करून करण्यात आल्याचं दिसतं. असे अनेक हल्ले स्पष्ट मॅप वापरून करण्यात आलेले आहे.

एरियल फोटो घेणे अशक्य असल्यामूळे भारतात मॅप ब्लर (अस्पष्ट)

भारत क्षेत्रफळाने खुप मोठा देश आहे. त्यामूळे भारतात एरियल किंवा एयरक्राफ्ट(हेलिकॉप्टर) द्वारे फोटोग्राफी करणे अशक्य आहे. कारण या फोटोग्राफीला खुप वेळ आणि खर्च लागत असतो. एरियल फोटोग्राफी म्हणजे हेलिकॉप्टर, एयरक्राफ्ट आणि ड्रोन इत्यादीने फोटो घेणे. एरियल फोटोग्राफी खुप खर्चीक असल्यामूळे भारतात फक्त सैटेलाईट ने घेतलेले ब्लर(अस्पष्ट) चित्रे दाखवली जातात.

दर्जेदार माहितीसाठी आजच ReadMarathi.Com चा Whats app ग्रुप जॉईन करा.