कांग्रेस-NCP सोडून भाजप सोबत जाणार शिवसेना? उध्दव ठाकरे म्हणतात..

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून शिवसेना व भाजप यांच्यात गुप्त बैठका होत असल्याचं आपल्याला पहायला मिळत होतं. शिवसेना नेते संजय राऊत आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांच्यात देखील एक सिक्रेट बैठक पार पडली होती. या अगोदर पण सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजपाच्या काही नेत्यांच्या गुप्त बैठका झालेल्या आहे. त्यामूळे महाराष्ट्रात पुन्हा सत्ता परिवर्तनाचे वारे तर वाहत नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Will Shiv Sena leave Congress-NCP and go with BJP?)

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की मी अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या सोबत बसलेलो आहे. मी कुठेच जात नाही. शिवसेना आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चेमूळे उध्दव ठाकरे यांनी असं उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की “आमच्यावर लोकशाहीच्या हत्तेचा आरोप केला जात आहे. याला काळा दिवस म्हणून बोललं जात आहे. परंतु जेव्हा दबाव निर्माण करण्यासाठी ते तपास यंत्रणांचा वापर करतात तेव्हा केंद्र लोकशाहीला पांढरं करते का?

मागील काही दिवसांपासून आघाडी सरकार मध्ये बिघाडी बघायला मिळाली होती. अगोदर कांग्रेसने म्हटले होते की कांग्रेस एकटी निवडणूक लढणार, नंतर देवेंद्र फडणवीसांनी “शिवसेना भाजपाची दुश्मन नाही” असं बोलून टाकलं. त्यामूळे भाजप आणि शिवसेना एकत्र येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता.

दर्जेदार माहितीसाठी ReadMarathi.Com चा Whatsapp ग्रुप join करा