सोयाबीनचे दर पडतील? शेतकऱ्यांनी काय करायला हवं?

नमस्कार शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सोयाबीनचे भाव वाढतील की घटतील ही चिंता त्यांना नेहमी सतावत आहे. कारण सध्या काही लोकांकडून शेतकऱ्यांमध्ये अफवा पसवरल्या जात आहे. सोयाबीनचे दर पडतील, भाव घटतील अशा अफवा सध्या जोर धरत आहे. पण हे बाजारात आवक वाढवून भाव पाडण्याचं कारस्थान आहे. त्यामूळे शेतकरी बांधवांनी अशा अफवांना बळी न पडता बाजार भावांचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा. असं काही अभ्यासू शेतकऱ्यांचं मत आहे.

या वर्षी आपन बघीतलं आहे की संयम ठेवल्याने आपल्याला हवा तो भाव मिळू शकतो. जर या वर्षी शेतकरी बांधवांनी सोयाबीनची साठवनूक करून संयम ठेवला नसता तर भाव नक्कीच पाच हजाराच्या आत आले असते. शेतकरी बांधव आपल्या सोयाबीन उत्पादनाची टप्प्याटप्प्याने विक्री करत असल्यामूळे दर चांगले मिळाले आणि काही ठिकाणी मिळतही आहे. आता यापुढेही घाबरुन न जाता संयमाने वाटचाल करायला हवी. याचे चांगले परिणाम सोयाबीन बाजार भावांवर नक्कीच होतील अशी अपेक्षा आहे.

आपल्या शेतमालाला सध्या काय दर मिळत आहे हे सर्व शेतकरी बांधवांना माहिती असणं गरजेचं आहे. दररोज बाजार भावाची माहिती घेतल्याने आपला शेतमाल नेमका केव्हा विकायचा याचा अंदाज शेतकरी बांधवांना येतो. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांना शेतमालाचे दररोजचे ताजे बाजार भाव मिळावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत. त्यासाठी दररोज बाजार भाव आपल्या फोन वर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा. ग्रुप जॉईन करण्यासाठी WhatsApp बटनावर क्लिक करा…

Leave a Comment