शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचं : सोयाबीनचे दर वाढणार? सोयाबीन कधी विकायचं? पहा काय म्हणतात तज्ञ..!

सोयाबीन सध्याच्या काळात 6 ते 7 हजारावर स्थिर आहे, देशांतर्गत उद्योगांना सोयाबीनची गरज भासत असल्यामुळे सध्यातरी बाजारात सोयाबीनची मागणी वाढत आहे. त्यामुळे याचा परिणाम सोयाबीन दरांवर होत असून भाव स्थिर आहे. सर्वात जास्त सोयाबीनचे उत्पादन करणारे देश ब्राझील व अर्जेंटिनामध्ये उत्पादन घटले आहे. याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीन दरांवर होऊन बाजार भाव वाढतील का? असा प्रश्न अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यासाठी अशा शेतकर्‍यांना आम्ही ReadMarathi.Com च्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर देऊन त्यांचा समज-गैरसमज दुर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शेतमालाचे बाजार भाव, हवामान अंदाज आणि शेती विषयक माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा

Read Marathi WhatsApp Contact

सोयाबीनचे दर वाढणार? पहा काय म्हणतात तज्ञ

सध्यातरी बाजारात सोयाबीनचे दर 6 ते 7 हजाराच्या मध्ये स्थिर दिसून येत आहे. कालच्या बाजार भावांचा जर विचार केला तर राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरांमध्ये उसळी बघायला मिळाली. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव बाजार समितीमध्ये काल सर्वाधिक दर बघायला मिळाला, येथे जास्तीत जास्त 6910 रुपये दर मिळाला. बर्‍याच दिवसांपासून  6 ते 6.5 असा दर मिळत होता. त्यामुळे इथून पुढे काही का होईना सोयाबीनच्या बाजार भावांमध्ये वाढ बघायला मिळेल, कारण सोयाबीन उत्पादक आघाडीचे जे देश आहे त्या देशांमध्ये सोयाबीनची स्थिती फारशी चांगली नाहीये. आणि देशांतर्गत उद्योगांना सोयाबीनची गजर भासत आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीनची अधिक मागणी वाढण्याची शक्यता आहे. आणि साहजिकच आहे बाजारात जर अधिक मागणी वाढली तर भाव नक्कीच उसळी घेतील, असं मत तज्ञ व्यक्त करत आहे.

हे पण वाचा

आजचे सोयाबीन बाजार भाव

सोयाबीन कधी विकायचं?

आपल्या गरजेप्रमाणे आणि टप्प्याटप्प्याने आता शेतकऱ्यांनी सोयाबीन विकायला काढले तरी काही हरकत नाही. येत्या काळात दरांमध्ये सुधारणा होऊ शकते पण पाहिजे तेवढ्या प्रमाणात होणार नाही असा अंदाज आहे. आता मिळत असलेला 6 ते 6.5 दर शेतकऱ्यांना परवडेल असा आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या गरजेनुसार निर्णय घ्यायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना पैश्यांची टंचाई भासत नसेल अशा शेतकर्‍यांनी सोयाबीन ठेवायला काहीच हरकत नाही कारण येत्या काळात थोड्या प्रमाणात का होईना सोयाबीन दरांमध्ये वाढ बघायला मिळेल असा अंदाज वाटत आहे.

Leave a Comment