मॉन्सूनसह राज्य सरकारही झालं नॉट रिचेबल, आता शेतकर्याला आधार कोण देणार?
सध्या राज्यात राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेना पक्षातून एकनाथ शिंदे सोबत काही आमदारांनी बंड पुकारत हे आमदार शिंदे गटात सामील झाले. त्यामूळे राज्यातील आघाडी सरकारकडे बहुमत उरले नाही. राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे हे देखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामूळे ऐन पेरणीच्या काळात असा प्रकार घडल्याने शेतकर्यांच्या प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलं आहे.
राज्यातील बर्याच भागात मॉन्सूनचा पाऊस अजून पोहोचलेला नाही, ज्या भागात पाऊस पोहोचला त्या भागात पेरण्या होऊन शेतमालाने पावसा अभावी आता आपल्या माना टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. बोगस बियाणे, खतांचा तुटवडा(Shortage) या समस्यांना राज्यातील शेतकरी सामोरे जात आहे. अशातच आता मॉन्सूनसह राज्याचे सरकार देखील नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामूळे राज्यातील शेतकर्यांना आता आधार कोण देणार? हा मोठा प्रश्न आहे.
येथे वाचा – शेतकर्यांनो ! गाईची ही जात देते सर्वात जास्त दूध; शेतीसाठी जोडधंदा म्हणून करा पालन..!
मागच्या आठवड्यात एका बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘राजकारण आणि मॉन्सून अनिश्चित असतो’ असं म्हटलं होतं. शिवसेनेत हा बंड झाल्यानंतर अजून तरी सरकार वर अविश्वास ठराव आलेला नाही. कृषिमंत्री दादा भुसे बंडात सहभागी होऊन गुवाहाटीला रवाना झाल्यानंतर कृषी खात्याला कोणी वाली उरला नाही. त्यामूळे काल (27 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गैरहजर असलेल्या मंत्र्यांची मंत्रिपदे दुसर्या मंत्र्यांना तात्पुरते का होईना पण सोपवली आहे. कृषिमंत्री पद शंकरराव गडाख यांना देण्यात आले आहे. पण सध्या राज्यातील शेतकरी सामोरे जात असलेल्या समस्यांना नवीन कृषिमंत्री व्यवस्थितरित्या हाताळतील का? असा प्रश्न काही न्यूज चॅनेलने उपस्थित केला आहे.
यावर्षी राज्यात 151 लाख हेक्टर इतके खरिपाचे क्षेत्र आहे. पण त्यापैकी आतापर्यंत फक्त 13 लाख हेक्टर वर पेरणी झाल्याचा अंदाज आहे. मागच्या वर्षीचा जर विचार केला तर मागच्या वर्षी आतापर्यंत 23 लाख हेक्टर वर पेरणी पूर्ण झाली होती.