बाप रे..! महिलेने कोरोनाची लस घेतली आणि बनली करोडो रुपयाची मालकीन…

जगात असं रोज काहीतरी नवीन घडत असतं. ज्यापैकी काही घटना अशा असतात की ज्यावर आपला अजिबात विश्वासच बसत नाही. अशीच एक घटना ऑस्ट्रेलिया मध्ये घडली आहे. एका महिलेने कोरोना लसीचा डोस घेतल्या नंतर तीचे नशीबच बदलले आहे. लसीचा डोस घेतल्यानंतर तीला चक्क 7.4 कोटी (करोड) रुपयांची लॉटरी लागली आहे… Woman won vaccine lottery in Australia

हे पण वाचा

कोरोना महामारीने संपुर्ण जगाला मोठा धक्का दीला आहे. यामध्ये मोठ मोठ्या देशांचे आर्थिक चक्र बिघडले. तर काही देश हळूहळू यामधून बाहेर येऊ लागले आहे. बऱ्याच देशांनी यावर उपाय म्हणून लस निर्माण केल्या आहे. ज्या देशांमध्ये लस मोहीम जोरात चालू आहे त्या देशांमध्ये कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने कमी झाली आहे. पण काही देशांमध्ये लसींबद्दल गैरसमज आहे. काही देशातील लोक लस घेण्यास उत्सुक नाही. म्हणून तेथील सरकार लसीकरण व्हावं यासाठी वेगवेगळ्या मोहीम व योजना राबवत आहे. ऑस्ट्रेलिया मध्ये लसीकरणाला खुप कमी प्रतिसाद मिळत आहे. म्हणून तेथे एक लॉटरी मोहीम राबवली जात आहे. ज्यामध्ये जोआन झू नावाच्या एका महिलेने तब्बल 7.4 कोटी (करोड) रुपयांची लॉटरी जिंकली आहे..

आपल्या कामात व्यस्त होती महिला…

एका रिपोर्टनूसार महिलेने लस घेऊन लॉटरी रेजिस्ट्रेशन केल्यानंतर ती आपल्या दैनंदिन कामात व्यस्त झाली होती. तिला लॉटरी संदर्भात काहीही अपडेट मिळत नव्हते. जेव्हा तिला कळवण्यासाठी लॉटरी अधिकाऱ्यांनी फोन केला तेव्हा तिने तो फोन उचलला नाही. लॉटरी अधिकार्यांनी पुन्हा फोन केला त्यावेळेस तिला कळाले की ती 1 मिलियन डॉलर जिंकली आहे. अशा पध्दतीने लॉटरी योजना सुरु झाल्यानंतर तेथे 30 लाख लोकांनी लसीकरण करून लॉटरीमध्ये रेजिस्ट्रेशन केले आहे.

वाचा, प्रसिद्ध व्यक्तींबद्दल रोचक माहितीमराठी बायोग्राफी

Leave a Comment