कोरोनाचे एकही पेशंट नसणारे गाव..!

मुंबई : कोरोना व्हायरस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कोरोना व्हायरस एका गावामध्ये अजून पोहोचलाच नाही हे ऐकूण तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.

कोरोनामुळे संपुर्ण जगात भीतीचे वातावरण आहे. आणि देशात तर दुसऱ्या लाठेने राज्यांसह देशाचे कंबरडे मोडले आहे. मार्च 2020 मध्ये संपुर्ण देशात कडक लॉकडाउन करुन सुध्दा कोरोना पुर्णपणे आटोक्यात आला नव्हता. आता देश दुसऱ्या लाठेचा सामना करत आहे. दुसऱ्या लाठेला निपटण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारांनी पुर्वनियोजन न केल्यामुळे संपुर्ण देशासह महाराष्ट्राला विशेष फटका बसला. पण अशा परिस्थितीत राज्यातील एका गावामध्ये अजून पर्यंत एकही पेशंट न सापडल्यामुळे हे गाव चर्चेत आहे.(The village where no patient of corona)

या गावाचे नाव भालगाव आहे. हे गाव अहमदनगर जिल्ह्यात आहे. या गावा मध्ये अजून पर्यंत एकही पेशंट नसल्याचं गावातील वरिष्ट राजकीय मंडळी आणि गावकऱ्यांच म्हणणं आहे. हे सर्व गावातील राजकीय मंडळी, नागरिक आणि आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका या सर्वांच्या सहकार्याने शक्य झाल्याचे गावातील एका वरिष्ट नेत्याचे म्हणने आहे.

कोरोना व्हायरसला अटकाव घालणारे नियमांचे काटेकोरपणे पालन, गावात नेहमी स्वच्छता ठेवण्याचा कल आणि जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करण्यावर भर दिल्यामुळे दुसऱ्या लाठेत गावात एकही पेशंट सापडला नाही. अशी माहिती गावातील एका वरिष्ट नेत्याने दिली.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment