खुशखबर! आता शहरातील या लोकांना घर विकत घेण्यासाठी मिळणार स्वस्त लोन, लगेच घ्या जाणून..!

Cheap Home Loan Scheme: शहरांमध्ये राहणाऱ्या ज्या कुटुंबांना स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न आहे, त्यांच्यासाठी केंद्र सरकार एक नवीन योजना आणत आहे आणि त्यांना स्वस्त दरात सरकारकडून लोन मिळू शकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी केलेल्या घोषणेनंतर लोक या योजनेची तारीख आणि वेळ जाहीर होण्याची वाट पाहत होते.

हरदीप सिंग पुरी यांनी केली स्वस्त लोन योजनेची वेळ जाहीर

शहरांमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना होम लोनवरील (Home Loan) व्याजात सवलत देण्यासाठी पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये एक योजना आणली जाणार आहे, असं केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले. तसेच या योजनेचे स्वरूप सध्या तयार केले जात असल्याचं हरदीप सिंग पुरी यांनी आज सांगितले..

शहरातील या लोकांना मिळणार लाभ

शहरांमध्ये घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना कर्जाच्या व्याजात सवलत देण्यासाठी ही योजना सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात येणार आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामध्ये शहरांत राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक योजना जाहीर केली होती ज्यांच्याकडे स्वतःचे हक्काचे घर नाही आणि या घोषणेनुसार ही महत्वाची योजना पुढील महिन्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे. सरकारने शहरांत भाड्याच्या घरात, झोपडपट्ट्या तसेच चाळींमध्ये राहणाऱ्यांना गृहकर्जाच्या व्याजात (Home Loan interest rate) लाखोंची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरांत मोठी लोकसंख्या अजून देखील झोपडपट्ट्यांमध्ये राहते, त्यांना स्वत:चे घर मिळवण्यासाठी या कर्जाच्या व्याजात सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Leave a Comment