मुंबईकरांसाठी गुड न्यूज! वसई मध्ये निघणार तब्बल 76,000 घरांची लॉटरी; या तारखेपर्यंत नोंदणी सुरू;

Mumbai Mhada : वसई मध्ये राबवण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सार्वजनिक व खाजगी भागीदारी तत्त्वावर आता नव्याने सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला जात आहे. वसई पूर्व मधील तब्बल 360 एकर भूखंडावर हा प्रकल्प राबविला जात असून, या योजनेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 75,900 घर बांधण्याचे काम सुरू होणार आहे. 27,000 घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी यासोबतच अत्यल्प उत्पन्न गटासाठी 17,000 घरांची बांधणी होईल.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून वसई मधील राबविण्यात आलेल्या सुरक्षा मराठी प्रकल्पाकरिता म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केली. आता त्याप्रमाणेच म्हाडाने वसई पूर्व या ठिकाणी नव्याने सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्पाला कॉन्सेप्च्युअल कन्सल्टंट सर्व्हिसेस एलएलपी च्या माध्यमातून मान्यता मिळाली आहे (Mhada lottery mumbai). यामध्ये आता अल्प उत्पन्न गटामधील नागरिकांकरिता 45 हजार घर बांधली जातील. म्हाडाने निश्चित केलेला जो दर आहे त्याप्रमाणे लॉटरीच्या अंतर्गत 27 हजार घर विजेत्या नागरिकांना देण्यात येतील.

अल्प उत्पन्न गटामधील नागरिकांकरिता तीस हजार आठशे घरांची बांधणी होणार आहे. त्यापैकी 17,000 घरे ही स्वतः म्हाडाने जो दर निश्चित केला आहे त्या दरात उपलब्ध होतील. यासाठी तब्बल 22 लाख 50 हजार रुपये दर माडाने निश्चित केला आहे (Mhada lottery news). अल्प व अत्यल्प गटामधील नागरिकांकरिता 306 चौरस फूट, यासोबतच अल्प उत्पन्न गटामधील नागरिकांकरिता 324 चौरस फुटांची घरे असतील.

प्रशासनाच्या कल्याणकारी अशा प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून अत्यल्प प्रवर्गातील विजेत्या नागरिकांना राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून अडीच लाख रुपये एकत्रित रित्या अनुदान उपलब्ध करून दिले जाईल. आता अल्प उत्पन्न गटामधील कुटुंबीयांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही (Mumbai Mhada lottery 2023 registration). यासोबतच कमी उत्पन्न गटामध्ये विजेच्या नागरिकांना मुद्रांक शुल्क म्हणून 1000 रुपयांची रक्कम भरावी लागेल. उर्वरित योजने अंतर्गत 32,000 घरे आहेत ती विकासाच्या माध्यमातून चालू बाजारभावाप्रमाणे विकली जातील. त्यापैकीच अत्यल्प घरांसाठी 2,500 घरांची लॉटरी काढली जाईल. नोंदणी करण्यासाठी उमेदवारांनी https://surakshasmartcity.com या वेबसाईटला भेट देऊन नोंदणी करून घ्यावी.

प्रधानमंत्री आवास योजनेचे म्हाडा ही एक नोडल एजन्सी आहे. त्याप्रमाणे म्हाडा या प्रकल्पांसोबत संलग्न केला गेला आहे. या माध्यमातून म्हाडाला प्रत्यक्षपणे घरांचा साठा व नफा अजिबात मिळणार नाही. असेही त्या ठिकाणी स्पष्ट केले.

राज्यभरामध्ये राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून तब्बल 10 लाख 61 हजार घरांना मंजुरी दिली आहे (Mumbai Mhada lottery last date). सध्या 1 लाख 40 हजार घरांचे काम पूर्णपणे पार पडले असून, 3 लाख 32 हजार घरांचे काम चालूच आहे. सोबतच म्हाडाच्या कोकण विभागाअंतर्गत 59 हजार चारशे घरांचे बांधकाम सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे…

Leave a Comment