Cheap Home Loan : एखाद्या व्यक्तीला मिळत असलेले गृहकर्ज (Home Loan) हे त्याचे वय, पात्रता, उत्पन्न, व्यक्ती आणि कर्जाच्या बदल्यात तुम्ही खरेदी करू इच्छित असलेल्या मालमत्तेचे मूल्य यावर अवलंबून असते. जेव्हा जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो दरात (Repo Rates) बदल करते, त्याचप्रमाणे व्यावसायिक बँकांचे गृहकर्ज दर बदलतात. याशिवाय गृहकर्ज तुम्ही कोणत्या बँकेकडून घेत आहात यावरही अवलंबून असते. चला अशा 10 बँकांबद्दल जाणून घेऊया ज्या सर्वात स्वस्त कर्ज देतात.
या बँकांमध्ये मिळणार स्वस्तात गृहकर्ज (Cheap Home Loan)
स्वस्त गृहकर्ज देणार्यांच्या यादीत एचडीएफसी बँक सर्वात पुढे आहे. HDFC बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.50%, इंडियन बँक 8.50%, पंजाब नॅशनल बँक 8.50%, IndusInd बँक 8.50% आणि बँक ऑफ इंडिया 8.50% या किमान व्याजदराने गृहकर्ज प्रदान करते.
याठिकाणी मिळणार 8.70 टक्के दराने गृहकर्ज
दुसरीकडे, IDBI बँक त्यांच्या ग्राहकांना किमान 8.50 टक्के, बँक ऑफ बडोदा 8.60 टक्के आणि SBI टर्म लोन त्यांच्या ग्राहकांना 8.70 टक्के व्याजाने गृहकर्ज देते. याशिवाय, युनियन बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना किमान 7.70 टक्के दराने गृहकर्ज प्रदान करते.