खुशखबर! आता मुंबईत म्हाडाचे स्वस्त घर मिळणार; म्हाडाच्या 3600 घरांबद्दल मोठी बातमी..!

मुंबईतील म्हाडाच्या घरांची (Mhada Flats Mumbai) आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आता मुंबईत सामान्य लोकांना म्हाडाचे परवडणारे घर घेण्याची पुन्हा संधी मिळणार आहे. या 2024-25 आर्थिक वर्षात मुंबईमध्ये तब्बल 3600 घरे उपलब्ध होणार असून अनेकांना कमी किमतीत घर घेता येणार आहे. ही घरे मुंबई शहरात आणि उपनगरात उपलब्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ही घरे मुंबईत नेमकी कोणत्या ठिकाणी असणार? याची माहिती जाणून घेऊया.

मुंबईत घर खरेदी करण्यासाठी सामान्य माणसाची हिम्मत लागत नाही. कारण मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहे. त्यामुळे मुंबईत परवडणारे घर घेण्यासाठी सामान्य माणूस म्हाडा लॉटरीची प्रतीक्षा करतो. मुंबईत म्हाडाच्या घरांना इतर मंडळाच्या तुलनेत नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत असतो. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात म्हाडाकडून मुंबईमधील 4 हजार 82 एवढ्या घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. या घरांसाठी तब्बल 1 लाख 22 हजार अर्ज आले होते. आता पुढील काही दिवसांमध्ये मुंबईत 3600 घरांच्या उभारणीसाठी म्हाडाकडून नियोजन सुरू आहे.

मुंबईत कुठे असणार म्हाडाची घरे? (Mhada Flats Mumbai)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घरे उभारण्याची म्हाडाची तयारी सुरू असून वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी ही घरे असणार आहेत. म्हाडाची ही घरे पहाडी गोरेगाव (Goregaon), पवई, मागाठाणे, अॅण्टॉप हिल आणि कन्नमवार नगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

Leave a Comment