अरे वा! जुना फ्लॅट खरेदी केल्यास मिळेल मोठा दिलासा; आता तुमचा होणार फायदा..!

Buy Flat in Mumbai :  नवीन घर, फ्लॅट खरेदी केल्यानंतर त्या घरासाठी लागणाऱ्या कादगपत्रांपासून ते पैशांची जुळवाजुळव करून घर नावावर होईपर्यंतची प्रक्रिया खूप मोठी असते. घर घेतल्यानंतर घर नावावर करण्याच्या या प्रक्रियेत बरेच टप्पे येतात, त्यामुळे हे सर्व प्रक्रिया कधी संपणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. वेगवेगळ्या पावत्या, दाखले, काही महत्त्वाच्या व्यक्तीच्या सह्या घेताना येणार्‍या अडचणी आणि वेगवेगळे कर अशा बर्‍याच गोष्टी या काळात पाहायला मिळतात. पण, आता तुमची ही कटकट संपणार आहे. तुम्ही जर एखादे जुने घर किंवा फ्लॅट खरेदी केला तर आता या प्रक्रियेत चांगलाच दिलासा मिळणार आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या सुविधेनुसार आणि नवीन प्रशासकीय निर्णयानुसार आता नव्याने खरेदीखत असलेल्या जुन्या मालमत्तेवरील कर आणि पाणीपट्टी तुमच्या नावावर करण्यासाठी महापालिकेमध्ये अनेक फेऱ्या मारण्याची गरज नाही. कारण आता ही सुविधा दस्त नोंदणी करत असतानाच उपलब्ध करून देण्यात येणार आहे, यात पुण्यासह पिंपरी व राज्यामधील 15 महापालिकांचा समावेश आहे. प्रॉपर्टी कार्डवर असलेल्या युनिक आयडी क्रमांकाच्या मदतीने तुमच्या नावाचीच नोंद थेट महापालिकेच्या दप्तरी करण्यात येणार आहे.

येथे वाचा – म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

महापालिका हद्दीत असलेले जुने घर आणि फ्लॅट खरेदी केल्यावर त्यावर असलेले पाणीपट्टी बिल तसेच मालमत्ता कर (Property Tax) स्वत:च्या नावावर करण्याकरिता महापालिकेकडे स्वतंत्र अर्ज करावा लागतो. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बर्‍याचदा पालिकेच्या कचेरीत फेर्‍या माराव्या लागतात. पण, आता त्याचे नियम बदलण्यात आले आहेत याची माहिती नागरिकांकडे असणे आवश्यक आहे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून ही सुविधा मुंबई (Mumbai) महापालिकेला उपलब्ध करून देण्यात आली होती. आता ही सुविधा मुंबई महापालिकेमध्ये सुरू आहे. पुणे महापालिकेमध्ये काही तांत्रिक कारणांमुळे ही सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरीमध्ये ही सुविधा पुढील महिन्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

आनंदाची बातमी! आता मुंबईत याठिकाणी कमी किंमतीत मिळेल म्हाडाचा 1 बीएचके फ्लॅट, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment