म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा..!

म्हाडाचे घर (Mhada Flats) घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता म्हाडासंदर्भातील कोणतीही समस्या आणि तक्रार सोडवणे खूप सोपे होणार आहे. जानेवारी महिन्यापासून याची सुरुवात होणार आहे. ज्या लोकांना म्हाडाचे घर घ्यायचे आहे आणि ज्यांच्याकडे म्हाडाचे घर आहे अशा लोकांना याचा फायदा होणार आहे. म्हाडाच्या घरांसंदर्भात असलेल्या समस्या या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमोर मांडून त्यांचे निराकरण करून घेणे यामुळे सोपे होणार आहे. म्हाडाकडून जानेवारी महिन्यापासून प्रतेक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी वांद्रे पूर्व याठिकाणी असलेल्या म्हाडा भवनामध्ये चौथ्या मजल्यावरील सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा लोकशाही दिन म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन संपन्न होणार आहे. त्यामुळे म्हाडाच्या घर (Mhada Flats) घेतलेल्यांना थेट उपाध्यक्षांसमोर आपल्या समस्या मांडता येणार आहे आणि त्या सोडविता येणार आहे. बर्‍याच सरकारी कार्यालयांमध्ये लोकांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेण्यासाठी आणि त्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याकरिता लोकशाही दिन आयोजित केला जातो. याच धर्तीवर आता म्हाडाकडून (Mhada) दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार आहे.

आनंदाची बातमी! आता मुंबईत याठिकाणी कमी किंमतीत मिळेल म्हाडाचा 1 बीएचके फ्लॅट, येथे क्लिक करून पहा बातमी..

जर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी येत असेल तर दुसर्‍या दिवशी येणारा कामकाजाचा दिवस म्हाडा लोकशाही दिन म्हणून पाळला जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आचारसंहितेचा काळ सुरू असताना लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार नाही. म्हाडा लोकशाही दिनाकरिता विहित नमुन्यामध्ये अर्ज देणे आवश्यक आहे. त्याचे प्रपत्र 1 अ ते प्रपत्र ड चे नमुने हे म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्जदारांची तक्रार आणि निवेदने हे वैयक्तिक स्वरूपाचे असणे आवश्यक आहे, त्यासोबतच अर्जदाराला विहित नमुन्यामधील अर्जाच्या दोन प्रती 14 दिवस अगोदर पाठवणे आवश्यक आहे.

येथे वाचा – म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा..

नागरिकांना लवकरात लवकर निर्णय देणे सोपे होणार आहे, त्यासाठी विषयाशी संबंधित विभाग आणि मंडळप्रमुख त्यादरम्यान उपस्थित राहणार आहेत. म्हाडा लोकशाही दिनासाठी नागरिकांनी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती देण्यात येणार आहे.

म्हाडाच्या लोकशाही दिनात काही अर्ज स्विकारले जाणार नाहीये, जसे की विहित नमुन्यामध्ये नसलेले आणि त्यासोबत आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, न्यायप्रविष्ट प्रकरणे, आस्थापनाविषयक बाबी, सेवाविषयक आणि राजस्व वा अपील तसेच अंतिम उत्तर दिलेले वा देण्यात येणाऱ्या आदी प्रकरणी पुन्हा करण्यात आलेले अर्ज, तक्रार आणि निवेदने वैयक्तिक स्वरूपाचे नसेल तर असे अर्ज यामध्ये स्वीकारले जाणार नाहीत.

येथे वाचा – घर घेताना फसवणूक झाली तर हा पर्याय येईल कामी, पहा कामाची माहिती..!

Leave a Comment