पुणेकरांची परवडणाऱ्या घरांना पसंती; या ठिकाणी सर्वात स्वस्त घरे, पहा घरांच्या किंमती..

Affordable Flats Pune : पुण्यामधील मालमत्ता क्षेत्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून तेजी दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी घरांच्या विक्रीत सात टक्के एवढी वाढ नोंदविण्यात आली आहे. घरांच्या विक्रीसंदर्भात जर माहिती पाहिली तर असे दिसून येते की एकूण घरांच्या विक्रीमध्ये 50 लाख रुपयांपर्यंतच्या किमतीच्या घरांचा वाटा तब्बल 55 टक्के एवढा झाला आहे. म्हणजे सध्या जास्तीत जास्त ग्राहक 50 लाखांच्या खाली असलेल्या परवडणाऱ्या घरांना जास्त पसंती देत असल्याचं समोर आले आहे.

Affordable Flats Pune

पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी तसेच शिक्षणाचे माहेरघर म्हणून देखील खूपच प्रसिद्ध आहे. अलीकडच्या काळात पुणे शहराला आयटी हबचा दर्जाही मिळाला आहे. कारण शहरामध्ये मोठ मोठ्या आयटी कंपन्या आहे. त्यामुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात नोकर्‍या आहेत. हे लक्षात घेऊन पुण्यात घर घेऊन राहण्याचा विचार अनेकांच्या मनात येतो. याच कारणामुळे पुण्यात दिवसेंदिवस येणाऱ्यांची लोकसंख्या वाढत आहे.

येथे वाचा – म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

म्हणूनच जलद गतीने वाढणाऱ्या पुणे शहरामध्ये प्रॉपर्टी (Property in Pune) दिवसेंदिवस महाग होत आहे, येथील प्रॉपर्टीचे दर आकाशाला जाऊन टेकले आहेत. नागरिक पुण्यात राहण्यासाठी तसेच गुंतवणुकीसाठी प्लॉट, घर, जमीन, फ्लॅट, बंगलो आणि रो हाऊस या प्रॉपर्टीची खरेदी मोठ्या प्रमाणात करत आहे. या बातमीत आपण पुण्यात कोणत्या भागात कमी किमतीत घर मिळते? आणि पुण्यात कोणत्या भागात घरांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत? याची माहिती जाणून घेणार आहोत.

येथे वाचा – याठिकाणी प्लॉट, घर आणि फ्लॅट खरेदी करा; भविष्यात दुप्पट रक्कम मिळण्याची शक्यता..!

पुण्यात याठिकाणी कमी किमतीत घर (Affordable Flats Pune)

पुण्यामधील लोहगाव (1 BHK Lohegaon, Pune) परिसरामध्ये घरांच्या किमती सर्वात कमी आहे. याठिकाणी वन बीएचके घराची किमत जवळपास 14 ते 25 लाख यादरम्यान आहे, टू बीएचके घराच्या (2 bhk flat) किमती 22 ते 35 लाख रुपये या दरम्यान आहे आणि थ्री बीएचके घराच्या (3 bhk flat) किमती 35 ते 45 लाख रुपये यादरम्यान असून बंगलो आणि रो हाऊसेसच्या किमती जवळपास 40 ते 70 लाखांच्या दरम्यान असल्याची माहिती सोशल मीडिया वर मिळाली आहे.. 

आनंदाची बातमी! आता मुंबईत याठिकाणी कमी किंमतीत मिळेल म्हाडाचा 1 बीएचके फ्लॅट, येथे क्लिक करून पहा बातमी..

अलीकडच्या काळात वाघोली (Wagholi) परिसरात सुद्धा घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. असे असले तरी शहरातील इतर भागांच्या तुलनेत वाघोली परिसरामध्ये घरांच्या किमती थोड्याशा प्रमाणात कमी आहेत. या परिसरात वन बीएचके घराची (1bhk flat Wagholi Pune) किंमत जवळपास 15 ते 25 लाख यादरम्यान आहे, टू बीएचके घराची किंमत जवळपास 22 ते 40 लाख यादरम्यान आहे आणि थ्री बीएचके घरांच्या किंमती जवळपास 35 ते 55 लाखांच्या दरम्यान असून बंगला आणि रो हाऊसेसच्या किमती जवळपास 30 ते 60 लाखाच्या घरात असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Comment