Mumbai : अलीकडच्या काळात म्हाडा गृहनिर्माण योजनेतून (Mhada Housing Scheme) घर घेण्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबई – पुण्यात म्हाडा लॉटरीच्या माध्यमातून नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर (Affordable Mhada Flats) मिळते. मुंबई – पुण्यात खासगी घरांचे दर जास्त असल्याने हे दर सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. मात्र, म्हाडा सर्व सामान्य नागरिकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करत आहे. अलीकडेच सरकारने म्हाडाच्या घरांसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमूळे हजारो नागरिकांचा फायदा होणार आहे.
मुंबईकरांसाठी सरकारचं मोठं गिफ्ट
राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील म्हाडाच्या वसाहतीमध्ये राहत असलेल्या मुंबईकरांना या घोषणेने मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईमधील म्हाडाच्या 56 वसाहतींचे सेवा शुल्क माफ करण्याची महत्वाची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली. त्यामुळे आता मुंबईमधील म्हाडाच्या निवासी वसाहतीमध्ये राहत असलेल्या हजारो मुंबईकरांना भुर्दंडपासून सुटका मिळणार आहे. या निर्णयामुळे आता मुंबईमधील म्हाडा वसाहतींचा (Mhada Colony) तब्बल 384 कोटींचा दंड माफ करण्यात येणार आहे. मुंबईकरांसाठी हे मोठं गिफ्ट असल्याचं मानलं जात आहे.
येथे वाचा – म्हाडाचे घर घेणार्यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..
मुंबईत अलिकडेच पार पडलेल्या गृहनिर्माण व सहकार परिषद परिषदेत अनेक आमदारांकडून आणि सदस्यांकडून म्हाडाच्या 56 वसाहतींचा सेवा शुल्क माफ करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यादरम्यान म्हाडाच्या या 56 वसाहतींचे सेवा शुल्क माफ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले होते. यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी काल म्हाडाच्या 56 वसाहतींचे सेवा शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता म्हाडा वसाहतीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांकडून दंड म्हणून वसुल करण्यात येणारे 384 कोटी एवढे सेवा शुल्क माफ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आता म्हाडाच्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या 50 हजार रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.